Driving Licence : देशात कुठेही तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्याकडे ड्राव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्हाला गाडी चालवता येऊ शकत नाही. विना ड्रायव्हिंग लायसन्स गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे.
गाडी चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन्स सोबत असणे आवश्यक आहे. हे लायसन्स काढण्यासाठी अनेकांना आरटीओ ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतात. तसेच एकदा जाऊन ते काम पूर्ण होत नाही.

आरटीओ ऑफिसमध्ये लायसन्स काढण्यासाठी अनेकजण आलेले असतात त्यामुळे गर्दीही खूप असते. या सर्व त्रासातून आता तुमची सुटका होऊ शकते. आता गाडी चालवणाऱ्यांसाठी आरटीओकडून एक योजना आणली आहे.
घरबसल्या तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. त्यामुळे तुमचा आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याचा खर्चही वाचेल आणि वेळही वाचेल. गर्दीमध्ये उभेही राहावे लागणार नाही.
ऑनलाइन अर्ज कसा करणार
सर्वप्रथम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
ही वेबसाइट https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do आहे.
येथे राज्य निवडा आणि अप्लाय फॉर अ लर्नर्स लायसन्स वर क्लिक करा.
आता शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स फॉर्म भरा.
सर्व आवश्यक माहिती भरा.
आधार कार्डसह अर्जदार निवडा.
आधार प्रमाणीकरणाद्वारे सबमिट करा वर क्लिक करा आणि सबमिट करा.
आधार कार्ड तपशील आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
जनरेट OTP वर क्लिक करा.
नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा.
अटी व शर्ती स्वीकारा.
ऑथेंटिकेशन बटणावर क्लिक करा.
लायसन्स फी पेमेंट पर्याय निवडा.
ऑनलाइन चाचणीसाठी वेळ आणि तारीख निवडा.
त्यानंतर, ऑनलाइन चाचणी द्या.
तुम्ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला पुष्टी मिळेल.