Fitment Factor Hike : खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्री करणार ही मोठी घोषणा…

Ahilyanagarlive24 office
Published:

Fitment Factor Hike : देशाचा अर्थसंकल्प २०२३-२०२४ साठी लावलेच सादर होणार आहे. यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.

देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्ववभूमीवर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. तसेच केंद्रीय कर्मचारी केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लावून बसले आहेत.

१५ दिवसांनी भारताचा नवीन वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा पगारही वाढवला जाणार आहे.

फिटमेंट फॅक्टरची घोषणा अपेक्षित आहे

नवीन वर्षातील अर्थसंकल्पात फिटमेंट फॅक्टरबाबत अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात. जर फिटमेंट फॅक्टरबाबत काही निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन १८ हजार रुपये आहे. जर फिटमेंट फॅक्टरमध्ये काही बदल केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात 26,000 वाढ होईल. मात्र अर्थसंकल्पात काय निर्णय होणार याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

2.57 वरून 3.68 पट वाढ करण्याची मागणी

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात फिटमेंट फॅक्टरचा मोठा वाटा असतो. भूतकाळात, सूत्रांनी दावा केला होता की सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फिटमेंट फॅक्टरशी संबंधित मसुदा तयार करण्याच्या तयारीत आहे. मसुद्यात फिटमेंट फॅक्टरच्या सुधारणेवर चर्चा होणे अपेक्षित आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पट वाढवण्याची कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासून मागणी आहे.

कर्मचाऱ्यांचा नवीन वर्षातील DA लवकरच वाढवला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये जर ४ टक्क्यांनी वाढ केली तर कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होईल. सध्या कर्मचाऱ्यांचा DA हा ३८ टक्के आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe