Credit Card Alert : जर तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरत असताना सावध असावे, नाहीतर फसवणूक होऊ शकते.
काही गोष्टींसाठी क्रेडिट कार्डने पेमेंट करणे टाळावे नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कोणत्या आहेत त्या गोष्टी पाहुयात सविस्तर…
काय आहे नवीन नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यावर बंदी घातली आहे. या नियमांनुसार, परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 (FEMA) आणि इतर लागू नियमांनुसार निर्दिष्ट केलेल्या सेवांच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर प्रतिबंधित आहे.
या गोष्टींवर घातली आहे बंदी
- विदेशी मुद्रा व्यापार
- सट्टेबाजी मध्ये पैसे ठेवण्यासाठी
- कॉल बॅक सेवांसाठी
- जुगारात गुंतवणूक करणे
- घोड्यांच्या शर्यतीवर पैज लावणे
- प्रतिबंधित मासिक खरेदीसाठी
- लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यासाठी.
असा बसेल फटका
जर एखाद्याने प्रतिबंधित असणाऱ्या या गोष्टींसाठी त्याच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर नियमांनुसार त्याला जबाबदार धरून, त्याच्याकडून कार्ड परत घेतले जाऊ शकते.
त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर अनेक बँका आपल्या ग्राहकांना याबद्दल माहिती देत आहेत. त्यामुळे तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवा.