iQOO 5G Smartphone : जबरदस्त ऑफर ! iQOO चा 5G स्मार्टफोन 3 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Ahmednagarlive24 office
Published:

iQOO 5G Smartphone : जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन Amazon च्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमधून खरेदी करू शकता.

तुम्ही iQOO Z6 Pro 5G हा स्मार्टफोन 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विकत घेऊ शकता. यावर अनेक सवलती मिळत आहेत. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

जाणून घ्या फीचर आणि स्पेसिफिकेशन

कंपनीने या फोनमध्ये 2404×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.44 इंच AMOLED डिस्प्ले दिलेला आहे. जो 90Hz च्या रीफ्रेश दर आणि 1300 nits च्या ब्राइटनेस पातळीला सपोर्ट करत आहे.

स्टोरेजचा विचार केला तर या फोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. तसेच वापरकर्त्यांसाठी या फोनमध्ये 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम दिली आहे, ज्यामुळे त्याची एकूण रॅम 16GB पर्यंत आहे.

कंपनीचा हा 5G स्मार्टफोन आहे. यात तुम्हाला Snapdragon 778 5G प्रोसेसर पाहायला मिळेल. तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 64-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरासह 8-मेगापिक्सलचा वाईड अँगल आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये 4700mAh बॅटरी कंपनीने दिली असून आहे जी 66W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. फक्त 18 मिनिटांत हा फोन अर्धा चार्ज होतो असा दावा कंपनीने केला आहे. तसेच OS बद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe