Pension Scheme 2023: वयाच्या 60 नंतर येणाऱ्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा करणार असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही केंद्र सरकारने भन्नाट योजना सादर केली आहे. या योजनेमध्ये तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक 51 हजार किंवा 1.11 लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतो. हे लक्षात ठेवा कि या योजनेत तुम्ही फक्त 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री वय वंदना योजनाबद्दल सांगत आहोत. ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी निवृत्तीवेतनधारकांना मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर पेन्शन देते. ती केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) दोन्ही एकत्रितपणे चालवते, तिच्या अंतर्गत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक अधिक लोक अर्ज करू शकतात, गुंतवणूकदार या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक PMVVY योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहे. त्यांना दरमहा निवृत्ती वेतनाची हमी मिळेल.

15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला दरवर्षी 8% परतावा दिला जातो. पॉलिसीधारक संपूर्ण मुदतीत जिवंत राहिल्यास, उर्वरित रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते, परंतु मुदत पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास, पॉलिसीची खरेदी रक्कम नॉमिनीला दिली जाते. या अंतर्गत जर पती-पत्नी दोघांनी प्रत्येकी 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर एकूण गुंतवणूक 30 लाख रुपये होईल आणि तुम्हाला दरमहा 18,300 रुपये पेन्शन मिळेल.
पती-पत्नी लाभ घेऊ शकतात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर दोघांनाही सुमारे 3 लाख 7 हजार 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल म्हणेजच टोटल 6 लाख 15 हजार रुपये त्यानुसार गुंतवणूकदाराचे वार्षिक पेन्शन 51 हजार 45 रुपये असेल. जर तुम्हाला हे पेन्शन मासिक घ्यायचे असेल, तर तुम्हाला दरमहा 4100 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीची कमाल मर्यादा पूर्वी 7.50 लाख रुपये होती, ती आता 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
1000 ते 1.11 लाख पेन्शन
गुंतवणुकीच्या आधारावर, 1000 रुपये ते 9250 रुपये दरमहा पेन्शन दिले जाते. या योजनेत जास्तीत जास्त मासिक पेन्शन 9250 रुपये, 27,750 रुपये तिमाही पेन्शन, रुपये 55,500 सहामाही पेन्शन आणि कमाल वार्षिक पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. 1,11,000 रुपये पेन्शन. या योजनेत पती-पत्नी दोघांनी अर्ज केल्यास सुमारे 3 लाख 7 हजार रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे तुमची एकूण गुंतवणूक 6 लाख 15 हजार रुपये होईल आणि तुम्हाला वार्षिक 7.40% व्याज मिळेल म्हणजेच तुम्हाला वार्षिक 51 हजार पेन्शन मिळेल.
जर तुम्हाला हे पेन्शन मासिक घ्यायचे असेल, तर तुम्हाला दरमहा 4100 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. योजनेअंतर्गत 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी ग्राहकाला किमान 1.62 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्रैमासिक पेन्शनसाठी 1.61 लाख, सहामाहीसाठी 1.59 लाख आणि वार्षिक पेन्शनसाठी 1.56 लाख रुपयांची किमान गुंतवणूक करावी लागणार आहे.
हे पण वाचा :- IMD Alert : हवामान पुन्हा बिघडणार ! 22 जानेवारीपर्यंत 12 राज्यांमध्ये पाऊस तर 5 राज्यांमध्ये पसरणार थंडीची लाट ; वाचा सविस्तर