Hydrogen Fuel Truck : अदानी समूह आणणार कमी इंधनात जास्तवेळ चालणारा ट्रक, शिवाय प्रदूषणही होणार नाही

Ahmednagarlive24 office
Updated:

Hydrogen Fuel Truck : लवकरच भारतात हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रीक ट्रक दाखल होणार आहेत. पहिल्यांदाच भारतात हायड्रोजन इंधानावरील ट्रकचा वापर होणार आहे. ट्रकच्या तंत्रज्ञानात बदल करण्याचा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा निर्णय अदानी उद्योग समुहाने घेतला आहे.

याच पार्शवभूमीवर अशोक लेलँड आणि कॅनडाच्या बेलार्ड पॉवर यांच्या एक करार होणार आहे. त्याद्वारे खानकामासाठी हायड्रोजन इंधनावरील ट्रक वापरले जाणार असून ते या वर्षअखेर दाखल होणार आहे.

असा असणार ट्रक

या ट्रकची क्षमता 55 टन असून त्यात तीन हायड्रोजन टाक्या असणार आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, हे ट्रक 200 किलोमीटरची वर्किंग रेंज देतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बॅलार्ड पॉवर या टाक्या बनवणार आहे.

त्यासाठी बॅलार्ड आपले 120 kW PEM इंधन सेल तंत्रज्ञान वापरणार असून 2023 मध्ये इंधन सेल इलेक्ट्रिक ट्रक लाँच करणार असल्याचे अदानी समूहाने सांगितले आहे. खाणकाम आणि वाहतुकीच्या कामासाठी या ट्रकचा वापर केला जाणार आहे.

या प्रकल्पाचे नेतृत्व अदानी एंटरप्राइझ करणार असून त्यासाठी बॅलार्ड पॉवर हायड्रोजन ट्रकसाठी त्याचे FCmoveTM इंधन सेल इंजिन पुरवणार आहे. दरम्यान,बॅलार्ड पॉवर ही PEM इंधन इंजिन बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे.

तर अशोक लेलँड ही बस बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. त्याशिवाय अशोक लेलँडकडून तांत्रिक मदत केली जाणार आहे. तसेच ते कंपनी वाहन सहाय्यही देईल.

याबाबत बॅलार्ड पॉवरचे सीईओ रँडी मे यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “गत वर्षी अदानी समूहासोबत करार केल्यानंतर, आमची भागीदारी पुढे नेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.

आमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने, त्यांच्या हेवी ड्युटी मायनिंग ट्रकना जास्त शक्ती मिळेल. तसेच आमच्या शून्य उत्सर्जन इंजिनच्या मदतीने चांगले मायलेजही मिळेल. त्याच्या मदतीने, वेगाने इंधन भरले जाणार असून त्याच वेळी अधिक वजन उचलण्याची क्षमता वाढेल.

अदानी समूहानेही याबाबत एक घोषणा केली आहे. “येत्या 10 वर्षांमध्ये ते ग्रीन हायड्रोजन आणि संबंधित गोष्टींवर $ 50 अब्ज खर्च करणार आहेत. म्हणजे 4 लाख कोटी रुपयांहून अधिक. दरवर्षी सुमारे 30 लाख टन ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची आमची योजना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe