Ashneer Grover : फिनटेक स्टार्टअप ‘भारत पे’ चे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी गेल्यावर्षी 8 मिनिटांत 2.25 कोटी रुपये कमावले होते. हा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना?
Zomato च्या IPO मधून त्यांनी ही कमाई मागच्या वर्षी केली होती, त्यांनी एवढी मोठी रक्कम कशी कमावली याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. जाणून घेऊयात सविस्तर..

ग्रोव्हर यांनी उधार घेतले होते पैसे
ग्रोव्हर यांनी आपल्या पुस्तकात झोमॅटोच्या आयपीओमध्ये कर्ज घेऊन पैसे गुंतवल्याचे सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या खिशातून फक्त ५ कोटी रुपये गुंतवले होते. तसेच उरलेले 95 कोटी रुपये कोटक वेल्थकडून एका आठवड्यासाठी वार्षिक 10 टक्के व्याजावर कर्ज घेतले होते.
ग्रोव्हर यांनी पुस्तकात असेही सांगितले की, आयपीओ अर्जादरम्यान हा फंड एका आठवड्यासाठी ब्लॉक होतो. त्यासाठी त्यांना 20 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार असून हा शेअर्स घेण्याचा अतिरिक्त खर्च होता.
गत वर्षी आलेला झोमॅटोचा आयपीओ बंपर हिट ठरला होता. ते एकूण 30 वेळा ओव्हरसबस्क्राइब झाले. तसेच ग्रोव्हर यांना फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे 3 कोटी रुपयांचे शेअर्स 76 रुपये प्रति शेअर या इश्यू किंमतीवर मिळाले होते.
जुलै 2021 मध्ये, Zomato चा स्टॉक रु 116 वर उघडला आणि लिस्टिंगच्या 8 मिनिटात कंपनीचा स्टॉक 136 रुपये प्रति शेअर वर पोहोचला होता. याबाबत ग्रोव्हर यांनी त्याच्या पुस्तकात लिहिले होते की, “जोपर्यंत त्यांना प्रति शेअर 136 रुपये दराने शेअर मिळतात. व्याजानंतर माझी प्रति शेअर निव्वळ किंमत रु. 82-85 च्या दरम्यान होती, ज्यामुळे मला रु. 2.25 कोटी पेक्षा जास्त होते.”
झोमॅटोच्या या यशानंतर, ग्रोव्हर यांनी कार ट्रेड आयपीओसह त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तेव्हा एकूण 25 लाख रुपये गमावले. पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, स्टॉक मार्केट पब्लिक इक्विटी पोर्टफोलिओ बनवणे हे शक्य नाही.