Government Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या सणाला म्हणजे मार्च महिन्यात एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. महागाई भत्ता वाढीचा निर्णय या सणासुदीच्या दिवसात घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं पाहता सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात हा लाभ मिळतो.
दरम्यान आता 2023 मध्ये जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित आहे. हा DA वाढीचा लाभ हा एआयसीपीआयच्या डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार निर्धारित होणार आहे. ही डिसेंबर महिन्याची आकडेवारी जानेवारीअखेर येणार आहे. तज्ञांच्या मते मात्र डिसेंबर महिन्यातील आकडेवारीत मोठा बदल होणार नाही.

अर्थातच नोव्हेंबरमध्ये जी आकडेवारी होती तीच कायम राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नोव्हेंबर महिन्यातील एआयसीपीआयचे निर्देशांक 132.5 होते. डिसेंबर मध्ये देखील हीच आकडेवारी कायम राहिली तर सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. म्हणजेच सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे यामध्ये वाढ होऊन 41 टक्के दराने महागाई भत्ता आता कर्मचाऱ्यांना देऊ केला जाणार आहे.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून हा DA वाढीचा लाभ अनुज्ञय केला जाणार आहे. म्हणजेच होळीच्या सणाच्या आसपास म्हणजे मार्चमध्ये जर यावर निर्णय घेतला गेला तर एप्रिल पासून रोखीने म्हणजे मार्च महिन्याच्या वेतनासोबत हा लाभ लागू होणार आहे. अशा परिस्थितीत जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्यातील महागाई भत्ता थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना देऊ केली जाणार आहे.
पगारात किती वाढ होणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार हा 30 हजार रुपये महिना असेल तर अशा कर्मचाऱ्याचा पगार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाल्यास म्हणजे महागाई भत्ता 41% झाल्यास 900 रुपयांनी वाढणार आहे. म्हणजेच अशा कर्मचाऱ्यांना 10,800 रुपये एका वर्षात अधिक मिळतील.
राज्य कर्मचाऱ्यांना केव्हा मिळेल लाभ?
खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता चा लाभ दिल्यानंतर मग राज्य कर्मचाऱ्यांना या वाढीचा लाभ अनुज्ञय केला जातो. मात्र राज्य शासनाकडून याच्यावर लवकर निर्णय घेतला जात नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कायमच शासनाविरोधात यासंदर्भात रोष पाहायला मिळतो. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय केली जाणार आहे.