iPhone 11 Discount Offer : आयफोन घेण्याचा प्लॅन आहे मात्र पैसे कमी पडत आहेत? तर कमी बजेट असणाऱ्यांना आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयफोन 11 वर बंपर ऑफर लागली आहे. कमी किमतीत स्वप्नातील फोन खरेदी करण्याची संधी आहे.
अनेकांचे आयफोन घेण्याचे स्वप्न असते मात्र पैशाच्या कारणास्तव अनेकांना ते घेणे शक्य होत नाही. मात्र आता स्वस्तात आयफोन घेणे शक्य होणार आहे. कारण ई-कॉमर्स वेबसाइटवर मस्त ऑफर लागली आहे.
आयफोन ११ फक्त 12,200 रुपयांमध्ये मिळत आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्हीही ही ऑफर पाहू शकता. फ्लिपकार्टवर आयफोन खरेदीवर भन्नाट ऑफर मिळत आहे.
फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू आहे. यामध्ये आयफोनवर आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. आयफोन खरेदी करण्यासाठी अशी ऑफर मिल्ने कठीण आहे. त्यामुळे आता आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.
ऑफर
2021 मध्ये लॉन्च झालेल्या iPhone 11 चे बेस मॉडेल 64GB स्टोरेज सेलमध्ये खूपच कमी किंमतीत मिळत आहे. फोनच्या किमतीवर 13 टक्के सूट दिली जात आहे. आयफोन 11 येथे 43,900 रुपयांऐवजी 37,999 रुपयांना देण्यात येत आहे.
एक्सचेंज ऑफर
iPhone 11 वर 22,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. मात्र, त्याचा पूर्ण फायदा चांगल्या स्थितीत असणारा स्मार्टफोन बदलल्यानंतरच मिळणार आहे. यामुळे फोनची किंमत 37,999 रुपयांऐवजी 15,999 रुपयांपर्यंत असू शकते.
बँक ऑफर
iPhone 11 देखील Flipkart वर बँक ऑफरसह उपलब्ध आहे. तुम्ही निवडक कार्ड्सद्वारे पेमेंट करून रु.3799 पर्यंत बचत करू शकता. या प्रकरणात, तुम्हाला iPhone 13 च्या किंमतीवर 3799 रुपयांची सूट मिळू शकेल.
तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफर लागू केल्यास आणि सवलतीचा पूर्ण लाभ घेतल्यास, iPhone 11 ची किंमत फक्त 12,200 रुपये असू शकते. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ इच्छित नसाल तर आणि कार्ड ऑफरचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आयफोन ११ साठी 34,200 रुपये मोजावे लागतील.