Kisan Vikas Patra : दुप्पट पैसे हवे असतील तर येथे करा गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

Kisan Vikas Patra : जर तुम्हाला जबरदस्त परतावा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची लोकप्रिय योजना किसान विकास पत्र ही गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकतेच या योजनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. म्हणून पोस्टाच्या धमाकेदार योजनेत लगेच गुंतवणूक करा.

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने किसान विकास पत्र योजनेच्या व्याजदरात 20 आधार अंकांची वाढ केली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांचे तीन महिन्यांत त्यांचे पैसे पूर्वीपेक्षा दुप्पट होतील.

सध्या या योजनेत गुंतवणुक करणाऱ्यांना 7.20 टक्के व्याज मिळत आहे. नियमांमध्ये बदल केल्यानंतर आता मॅच्युरिटी कालावधी 10 वर्षांचा झाला आहे.

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही यामध्ये 1,000 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच आता तुम्ही 100 रुपयांच्या पटीतही गुंतवणूक करू शकता.गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केली नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेत तुम्ही तुमचे खाते सहज उघडू शकता. सर्वात अगोदर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डिपॉझिट पावतीसह अर्ज भरावा लागणार आहे. येथे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे पैसे रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe