e-PAN Card : सरकारी किंवा इतर कामांसाठी आता पॅन कार्ड खूप आवश्यक आहे. आजकाल सगळ्यांकडे पॅन कार्ड आहे. जर पॅन कार्ड नसेल तर अनेक कामे अडकून पडतात.
काही जणांचे पॅन कार्ड हरवते किंवा चोरीला जाते, त्यामुळे आता घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही आता घरबसल्या ई-पॅन कार्ड काढू शकता. त्याचे अनेक फायदेही आहेत.

असे करा डाउनलोड
स्टेप 1
- सगळ्यात अगोदर तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- मग येथे तुम्हाला खालील क्विक लिंक्सच्या मथळ्यामध्ये काही लिंक्स दिल्या आहेत, त्यापैकी तुम्हाला ‘इन्स्टंट ई-पॅन’ सह लिंकवर क्लिक करावे लागणार आहे.
स्टेप 2
- त्यानंतर तुम्हाला Get e-PAN लिंकवर क्लिक करावे लागणार आहे.
- येथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागणार आहे.
- तुमचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक केलेले असावे तसेच तुमच्या आधारवर जन्मतारीख पूर्ण नमूद केलेली असावी.
स्टेप 3
- त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या माहितीवर क्लिक करावे लागणार आहे.
- आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकावा लागेल.
- आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी तसेच इतर आवश्यक माहिती येथे भरावी लागेल.
स्टेप 4
- तुम्हाला सबमिट र क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर मिळेल
- या वेबसाइटच्या डाउनलोड पॅन लिंकवर जाऊन तुम्ही ई-पॅन कार्ड म्हणजेच तुमचे पॅन कार्ड PDF मध्ये डाउनलोड करू शकता.
- जर तुम्ही हार्ड कॉपी ऑर्डर केली तर तुम्हाला 50 रुपये मोजावे लागणार असल्याचे आयकर विभागाच्या वेबसाइटवरील संदेशात म्हटले आहे.