Anant Ambani : भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे फोटो सध्या सोशल मीडीवर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनंत अंबानीचे शरीर पाहून अनेकांना धक्का बसत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी अनंत अंबानी यांचे वजन मोठ्या प्रमाणात कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा जुन्या स्थितीत आले आहेत. त्यामुळे यामागे काय कारण असू शकते हे तुम्ही जाणून घ्या.
अनंतने 108 किलो वजन कसे कमी केले?
अनंत दररोज सुमारे 5 तास व्यायाम करायचा, ज्यामध्ये सुमारे 20 किलोमीटर चालणे आणि योगासने करणे या गोष्टींचा समावेश होता. अनंत हेल्दी डाएटमध्ये कमी कार्ब, हाय फायबर फूडसोबत ताजी फळे आणि भाज्या खात असे. याशिवाय त्यांनी तेलकट आणि गोड पदार्थ खाणे खूप कमी केले होते.
शरीर पाहून सर्वांना धक्का बसला
यानंतर अनंत अंबानींचा हसरा फिगर पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले, कारण इतके वजन कमी करणे सोपे नाही. खूप कठीण वाटणारी गोष्ट अनंतने आपल्या मेहनतीने शक्य करून दाखवली आहे. त्यानंतर त्याला ट्रोल करणारे त्याचे कौतुक करताना थकत नव्हते, पण 2023 मध्ये असे काय घडले की अनंतचे वजन पुन्हा वाढले.
अनंतचे वजन वाढण्याचे मोठे कारण
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, वजन कमी केल्यानंतर ते टिकवून ठेवणे खूप आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही पुन्हा जुन्या आकारात याल. त्यामुळे वजन कमी केल्यानंतर आता तेलकट आणि गोड पदार्थ पुन्हा खाता येतील असा विचार करू नका. यासोबतच शारीरिक क्रिया करत राहणे आवश्यक आहे, अन्यथा सर्व मेहनत व्यर्थ जाईल.
वजन कमी केल्यानंतरही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
वजन कमी झाल्यानंतर भूक हार्मोन वाढतो, तर स्नायू कमी झाल्यामुळे चयापचय मंदावतो, त्यानंतर तुम्ही कमी अन्न खाल्ले तरी वजन वाढू शकते. टीन एजमध्ये डाएटिंग केल्याने भविष्यात लठ्ठपणाचा धोकाही वाढतो. म्हणूनच वजन कमी करूनही निरोगी आहार आणि जीवनशैली पाळली पाहिजे.