iQoo Neo 7 5G : लाँच होण्याअगोदरच लीक झाले iQoo Neo 7 5G चे डिझाइन आणि फीचर्स, पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iQoo Neo 7 5G : iQoo लवकरच आपला आगामी स्मार्टफोन iQoo Neo 7 5G लाँच करणार आहे. iQoo च्या या फोनमध्ये 3D कुलिंग सिस्टम उपलब्ध असणार आहे.

कंपनीच्या इतर स्मार्टफोनप्रमाणे यादेखील फोनमध्ये जबरदस्त फीचर्स असणार आहेत. परंतु, हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वी डिझाइन आणि फीचर्स लीक झाली आहेत.

या नवीन स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर उपलब्ध असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रोसेसरसह भारतात येणारा हा पहिला फोन असणार आहे. भारतात हा स्मार्टफोन दोन रंगात सादर केला जाणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी हा फोन लॉंच होणार आहे.

भारतात या स्मार्टफोनला 3D कूलिंग सिस्टमसह 120W फ्लॅश चार्जिंग मिळणार आहे. फोनचा AnTuTu स्कोअर 890000+ आहे. यामध्ये 6.78-इंचाचा 120Hz E5 AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. तसेच तीन रियर कॅमेरे उपलब्ध असणार आहे.

यात पंचहोल स्टाईलमध्ये सेल्फी कॅमेरा उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या या आगामी फोनची फीचर्स iQoo Neo 7 SE सारखीच असणार आहेत. iQoo Neo 7 SE चीनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरसह सादर केला आहे. यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 120W फ्लॅश चार्जिंग उपलब्ध असणार आहे.

तसेच या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे असून ज्यात प्राथमिक लेन्स 64 मेगापिक्सेल आहे. कॅमेरासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. समोर 16-मेगापिक्सल कॅमेरा कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी दिला आहे.