CHME Society Nashik Bharti 2024 : नाशिकमधील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध जागांसाठी सुरु आहे भरती, असा करा अर्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CHME Society Nashik Bharti 2024 : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “अध्यापन कर्मचारी, वरिष्ठ महाविद्यालयीन व्याख्याता, सैनिकी प्रशिक्षण अधिकारी, शिक्षकेतर, शिपाई, चालक, बस चालक, हाऊसकीपिंग कर्मचारी, बागकाम कर्मचारी, सफाई कर्मचारी” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://bhonsala.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-यासाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येतील.

-अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.