Panjabrao Dakh Mansoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधव मानसूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मान्सूनचे आगमन केव्हा होणार हाच मोठा सवाल या मंडळीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. खरे तर भारतीय शेती ही सर्वस्वी मान्सूनवर आधारित आहे. मान्सून काळात चांगला पाऊस झाला तर शेतीमधून बऱ्यापैकी उत्पादन मिळवता येते अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
गेल्या वर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस झाला आणि यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. हेच कारण आहे की मान्सून 2024 कसा राहणार, मान्सूनचे आगमन केव्हा होणार हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. दरम्यान मान्सून 2024 संदर्भात पंजाबरावांनी एक मोठी माहिती दिली आहे.
पंजाबराव डख पाटील यांनी महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कधी हजेरी लावणार, पेरणी योग्य पाऊस कधी होणार, शेतकऱ्यांच्या पेरण्या कधीपर्यंत पूर्ण होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली आहे. दरम्यान आता आपण पंजाबरावांचा हा मान्सून 2024 चा सुधारित अंदाज अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Mansoon 2024 चा पहिला पाऊस कधी पडणार?
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा 22 मे ला अंदमानातं मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून संदर्भात माहिती देताना पंजाबरावांनी ज्या वर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस पडत असतो असे म्हटले आहे.
गेल्या वर्षी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती आणि यामुळे महाराष्ट्रात कमी पाऊस झाला असा दावा त्यांनी केला आहे. यंदा मात्र तशी परिस्थिती नाहीये अर्थातच यंदा उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाहीये, यामुळे यंदाचा पावसाळा हा चांगला राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस होणार असे पंजाबरावांनी म्हटले आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे यंदा आपल्या महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
म्हणजे 12-13 जूनला राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तथापि, महाराष्ट्रात पेरणी योग्य पावसाला 22 जून नंतरच सुरुवात होणार आहे.
22 जून नंतर पेरणी योग्य पावसाला सुरुवात होईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील असे भाकीत पंजाबरावांनी यावेळी वर्तवले आहे.
एवढेच नाही तर यावर्षी जुलैमध्ये जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच धरणे फुल भरतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे आता पंजाबरावांचा हा मान्सून 2024 चा सुधारित अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.