WhatsApp new feature : WhatsApp ने आणले शानदार फीचर! फक्त ‘या’ वापरकर्त्यांनाच वापरता येणार

Ahmednagarlive24 office
Published:

WhatsApp new feature : WhatsApp वापरकर्त्यांसाठी गुडन्यूज आहे. WhatsApp ने पुन्हा एकदा भन्नाट फीचर आणले आहे. परंतु, फक्त आयफोन वापरकर्त्यांना हे वापरता येईल.

या नवीन फीचरमुळे चॅटिंग आता आणखी मजेशीर होणार आहे. दरम्यान सतत WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी फीचर्स आणत असते. याचा पुरेपूर फायदा वापरकर्ते घेत असतात.

या नवीन अपडेटनंतर, आयफोन वापरकर्त्यांना आता तारखेनुसार कोणताही व्हिडिओ, मजकूर किंवा दस्तऐवज फाइल असलेले संदेश शोधता येईल. जर तुम्हाला हे अपडेट मिळाले नसेल तर काळजी करू नका. कारण तुम्हालाही त्याचे अपडेट लवकरच मिळेल.

व्हॉट्सअॅपच्या या नवीन अपडेटचा आवृत्ती क्रमांक 23.1.75 असून त्या अपडेटसोबत एक ड्रॅग अँड ड्रॉप फीचरही आले आहे, म्हणजेच व्हॉट्सअॅप चॅटचा फोटो-व्हिडिओ ड्रॅग करून तुम्हाला तो इतर कोणत्याही अॅपमध्ये टाकता येईल.

उदाहरणाद्वारे सांगायचे झाले तर, तुम्हाला व्हॉट्सअॅपवर फोटो मिळाला असेल, तर तुम्हाला तो सेव्ह न करता Gmail वर ड्रॅग करता येईल. नुकतेच मेटा यांच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp सह EU डेटा संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे.

मेटाला आयरिश नियामकाने गुरुवारी अतिरिक्त 5.5 दशलक्ष युरो (सुमारे 47.8 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. मागच्या दोन आठवड्यांपूर्वी, युरोपियन युनियनने समान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मेटाच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्लॅटफॉर्मवर 390 दशलक्ष युरो (सुमारे 3,429 कोटी रुपये) दंड ठोठावण्यात आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe