IGNOAP Scheme : सरकारची ‘ही’ योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरतेय वरदान, लगेच करा अर्ज

Updated on -

IGNOAP Scheme : केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते, याचा फायदाही जनतेला होतो. यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना होय.

परंतु अनेकांना या योजनेबद्दल आणि तिच्या फायद्यांबद्दल माहिती नाही. त्यामुळे ते या योजनेपासून मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित राहतात. जाणून घेऊयात पात्रता आणि फायद्यांसह सर्वकाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचा (NSAP) भाग म्हणून ही योजना लागू केली आहे. ही एक गैर-सहयोगी योजना असून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना किंवा अशा निर्वासितांकडे उत्पन्नाचा कोणताही अन्य स्रोत नाही त्यांना लाभ घेता येतो.

कोणाला करता येतो अर्ज

वय: 60 वर्षे आणि त्यावरील
दारिद्र्यरेषेखालील असणारे (BPL)

असा होईल फायदा

या योजनेमुळे अनेकांना खूप फायदा होत आहे. दरम्यान आता राज्याच्या हिश्श्याच्या आधारे पेन्शनची रक्कम ठरवण्यात येणार आहे. ती आता 600 ते 1000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शनच्या स्वरूपात असू शकते.

असा करा अर्ज

जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, ग्रामीण भागातील अर्जदारांना शहरी भागातील IGNOAP योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गट विकास कार्यालय आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे जावे लागणार आहे. तुमच्या क्षेत्रातील समाज कल्याण विभागात जाऊन अर्ज मिळवा. तसेच फॉर्म भरताना योग्य तपशील द्या.

राज्य/जिल्हा/ब्लॉक
• ग्रामपंचायतीचे नाव
• सोसायटीचे नाव
• लाभार्थीचे नाव
• घर क्रमांक
• लिंग
• वय
• जन्मतारीख
• जन्म प्रमाणपत्र
• वार्षिक उत्पन्न आणि प्रमाणपत्र / बीपीएल कार्ड
• अधिवास प्रमाणपत्र
• प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख
• EPIC क्रमांक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!