HP Envy x360 15 : HP चे सर्व लॅपटॉपला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असणारे लॅपटॉप्स सादर करत असते. काही लॅपटॉप हे ग्राहकांच्या बजेटबाहेर असतात तर काही लॅपटॉप ग्राहकांना परवडणारे असतात.
कंपनीचा असाच एक लॅपटॉप आहे जो आता ग्राहकांना कमी बजेटमध्ये विकत घेता येईल. HP Envy x360 15 असे या मॉडेलचे नाव आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 1TB स्टोरेज आणि टच डिस्प्ले दिला आहे. तसेच इतर फीचर्सही जबरदस्त आहेत.
इतकी आहे किंमत
HP Envy x360 15 या मॉडेलची किंमत 82,999 रुपयांपासून सुरू होत आहे. स्टोरेजचा विचार केला तर हे 8 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट असून ते 12व्या जनरेशनच्या Intel Core i5 सह उपलब्ध आहे. तर फुल-एचडी डिस्प्लेसह 16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 86,999 रुपये इतकी आहे. तसेच लॅपटॉपच्या OLED टच डिस्प्ले व्हेरिएंटची किंमत 94,999 रुपये इतकी आहे. Intel Core i7 CPU, 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटची किंमत 1,14,999 रुपये इतकी आहे.
अशी असणार स्पेसिफिकेशन
या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा OLED iSafe-प्रमाणित टच डिस्प्ले आहे. हे चुंबकीय कनेक्शनसह येत असून, HP MPP 2.0 टिल्ट पेन वापरताना सूक्ष्म तपशील कॅप्चर करण्यासाठी अधिक चांगली विलंबता आणि संवेदनशीलता प्रदान करण्यासाठी डिझाइन कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी केले आहे. हा 12व्या जनरेशनच्या Intel Core i7 प्रोसेसरद्वारे समर्थित असून जो Intel Iris Xe इंटिग्रेटेड ग्राफिक्सने सुसज्ज आहे.
तसेच कंपनीच्या या लॅपटॉपसह 5-मेगापिक्सेल वेबकॅम आणि IR चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. कॅमेरासोबत फिजिकल कॅमेरा प्रायव्हसी शटर उपलब्ध असणार आहे. यात Bang आणि Olufsen स्पीकर्स तसेच कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ 5.2 सपोर्ट करण्यात आला आहे.
इतके असणार बॅटरी आयुष्य
कंपनीचा असा दावा आहे की हा लॅपटॉप 10 तासांपर्यंत बॅटरी आयुष्य देऊ शकतो. फास्ट फाईल ट्रान्सफरसाठी हे HP QuickDrop यात येते. याशिवाय, HP पॅलेट प्रोग्राम लॅपटॉपमध्ये फोटो स्केचिंग आणि फोटो व्यवस्थापनासाठी प्री-लोड केलेला आहे.