FD Credit Card : बँकांनी आणलेल्या सुविधेमुळे ग्राहकांना खूप फायदा होतो. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट सुविधा आणली आहे.
मुदत ठेवींवर क्रेडिट कार्ड मिळणार असल्याची घोषणा या बँकेने केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी सुविधा सुरु करणारी PNB ही पहिली बँक ठरली आहे. तसेच यावर बँकेच्या ग्राहकांना शानदार ऑफरही मिळणार आहेत.

असे मिळवा क्रेडिट कार्ड
- जर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्हाला कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही.
- तसेच तुम्ही शाखेला भेट न देता ऑनलाइन अर्ज करू शकता.
- ही बँक कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय लगेच व्हर्च्युअल क्रेडिट कार्ड जारी करणार आहे.
- हे सर्वसमावेशक विमा संरक्षण (रुपे आवृत्तीवर) प्रदान करेल.
- रुपे क्रेडिट कार्डला UPI लिंकेजचाही खूप फायदा आहे.
- यावर रोमांचक रिवॉर्ड पॉइंट आणि ऑफर आहेत.
याबाबत पीएनबीने अधिकृत ट्विट करून एफडीवर क्रेडिट कार्डची माहिती दिली. तसेच जर तुम्हाला याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
0120-4616200, 1800 180 2345
Having an FD just got cool. Get lounge access, exciting reward points, cash advance and much more with Credit Card against Fixed Deposits!
For more info, connect with us on: 0120-4616200, 1800 180 2345.#FixedDeposit #CreditCard #Offers #Digital #Banking pic.twitter.com/nlfLUacKb2
— Punjab National Bank (@pnbindia) January 19, 2023
मिळत आहे आणखी एक शानदार ऑफर
PNB शून्य प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्कासह नवीन वर्षाच्या योजना सुरू करण्यासाठी सणाच्या भेटी देत असून ग्राहकांना आता अनुक्रमे 8.55 % आणि 8.40 % व्याजदराने गृह कर्ज आणि कार कर्ज मिळेल. जर तुम्हाला अधिक तपशील जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या शाखेला भेट देऊ शकता किंवा बँकेच्या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकता.