लग्नाच्या विचारात आहात, मग यायला लागतंय; नगरमध्ये रविवारी मराठा वधू-वर पालक मेळावा

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News:सकल मराठा सोयरीक ग्रुप अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत शेतकरी निवास सभागृह किसान क्रांती बिल्डींग मार्केट यार्ड अहमदनगर येथे सकल मराठा वधू-वर व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला नगर शहराचे आ. संग्रामभैय्या जगताप, महानगर पालिकेचे उपमहापौर गणेश भोसले,स्थायी समितीचे अध्यक्ष कुमारसिंह वाकळे,विरोधीपक्ष नेते संपतराव बारस्कर, मराठा सेवा संघाचे श्री .विठ्ठलराव गुंजाळ,सोयरीक ग्रृपच्या राज्याध्यक्षा, प्राचार्या सौ.रजनीताई गोंदकर, सोयरीक ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रामचंद्र राऊत हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यास वधू – वर व त्यांच्या पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रुपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मणराव मडके, सोयरीक ग्रुपच्या महिला अध्यक्षा सौ.मायाताई जगताप यांनी केले आहे. हल्ली मराठाच नव्हे सर्वच समाजात मुला-मुलींचे लग्न जमविणे हे जिकिरीचे होऊन बसले आहे.

पूर्वी नात्यातून स्थळे येत होती, ती पद्धत आता बर्‍याच अंशी बंद झाली आहे. पै-पाहुण्यांना वेळ मिळत नाही आणि खासगी वधूवर केंद्राकडून पालकांची लूट केली जात आहे.या पार्श्‍वभूमीवर अशा समाजाकडूनच आयोजित केलेल्या वधूवर मेळाव्यांची चांगली मदत होत आहे.

प्रत्येकवेळी या वधूवर मेळाव्यास उपस्थित राहून लग्न जमण्याचे प्रमाणही वाढत आहे. नाममात्र शुल्कात थेट मुला-मुलींना पाहण्याची संधीच या मेळाव्यात उपलब्ध होते. त्यात पसंती झाल्यास पुढे जाऊन प्रत्येकाने सोयरिक करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु प्राथमिक माहितीसाठी या मेळाव्याचा चांगला उपयोग होत असल्याच्या समाजातील पालकांच्या प्रतिक्रिया आहेत.

या मेळाव्यात उच्चशिक्षित, शिक्षित, व्यावसायिक, उद्योजक, कारखानदार, शेतकरी वधु – वरांसह विधवा,विधूर, घटस्फोटीत यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असणार आहे,अधिक माहितीसाठी 9372144701 या संपर्क साधावा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री बाळासाहेब वाकचौरे,विनोद वाडेकर, दशरथ मांडे,,रोहिणी वाघमारे,बाळासाहेब भोर,उद्योजक धर्मेंद्र गीते, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संपूर्णा सावंत,

रामेश्‍वरी लाटे ,राजेश सरमाने,रघुनाथ झावरे, संपदा ससे, शीतल चव्हाण, आशा साठे,अनिल गडाख, सुरेखा चेमटे,कांताताई बोठे, श्रीमती नंदा वराळे,धनंजय सांबारे,पोपट शेळके,अच्युत गाडे,हरीभाऊ जगताप, जयकिसन वाघ, कृष्णा लोखंडे आदीसह सकल मराठा समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe