Vodafone-Idea : जर तुम्ही व्होडाफोन-आयडिया या कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे. कारण या कंपनीचे प्लॅनही गायब झाले आहेत. या कंपनीवर कोट्यावधी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे कंपनी बंद होणार आहे.
दरम्यान या कंपनीचे देशात खूप ग्राहक आहेत. कंपनी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन सादर करत होती. यातील काही प्लॅन हे महाग आहेत तर काही प्लॅन खूप स्वस्त आहे. अशातच कंपनी बंद होनायच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता कंपनीनेच स्पष्टीकरण दिले आहे.

जाणून घ्या कंपनीचे मत
व्होडाफोन-आयडिया बंद झाल्याच्या बातम्या सध्या येत आहेत. यावर कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला काही चुकीचे मीडिया रिपोर्ट मिळाले असून ज्यात दावा केला आहे की Vi प्रीपेड रिचार्ज सेवा काही तासांसाठी उपलब्ध होणार नाही.
परंतु,आम्ही आमच्या ग्राहकांना असे सूचित करू इच्छितो की, कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. Vi ने फक्त दिल्ली सर्कलमधील काही प्रीपेड वापरकर्त्यांना 22 जानेवारीच्या रात्री ते 23 जानेवारीच्या सकाळपर्यंत काही तासांसाठी सिस्टम अपग्रेडबद्दल एसएमएसद्वारे माहिती दिली आहे, या कालावधीत रिचार्ज सेवेमध्ये काही विलंब होण्याची शक्यता आहे.
का गायब झाले रिचार्ज प्लॅन?
रिचार्ज प्लॅन गायब झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचे कंपनीचे मत आहे. खरे तर, सिस्टम अपग्रेडमुळे दिल्ली सर्कलमधील रिचार्ज योजना काही तासांसाठी दिसणे बंद झाले होते. परंतु, कंपनी बंद नाही.
प्लॅन महाग होऊ शकतो
एका अहवालानुसार, कर्जाची परतफेड करण्यासाठी Vodafone-Idea (Vi) ला टॅरिफ प्लॅन 25 टक्क्यांपर्यंत वाढवावा लागणार आहे. व्होडाफोन-आयडियाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. सध्या या कंपनीवर 780 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी 78 कोटी म्हणजेच फक्त 10 टक्के रक्कम कंपनी भरू शकते.
2027 पर्यंत सरकारची थकबाकी भरण्यासाठी टॅरिफ योजनेत 25 टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागणार आहे. तसेच ब्रोकरेज हाऊसचा असा विश्वास आहे की प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही टॅरिफ योजनांमध्ये वाढ होऊ शकते, परंतु पोस्टपेडमध्ये वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे.