Hero New Scooter : जर तुम्ही शानदार फीचर्स असणारी स्कुटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप आनंदाची आहे. कारण भारतीय बाजारात Hero MotoCorp कडून एक नवीन स्कूटर लाँच होऊ शकते.
कंपनी आपल्या ग्राहकांसाठी या स्कुटरमध्ये 110cc इंजिन,डिजिटल ट्रिप मीटर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी भन्नाट फीचर्स देऊ शकते. त्यामुळे तुमचे बजेट तयार ठेवा कारण कंपनी कधीही स्कुटर लाँच करू शकते.
या दिवशी होणार लाँच
मार्केटमध्ये लवकरच हिरोची नवीन स्कूटर लाँच होऊ शकते. कंपनीने काही दिवसांपूर्वी Activa चे नवीन व्हर्जन लाँच लाँच केले आहे. अशातच आता कंपनीकडून नवीन स्कूटर लाँच करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत कंपनीने मीडिया इन्व्हाईट जारी केले असून यात स्कूटरची झलक पाहायला मिळत आहे. कंपनी 30 जानेवारीला बाजारात नवीन स्कूटर सादर करण्याची शक्यता आहे.
अशी मिळणार फीचर्स
रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या या नवीन स्कूटरमध्ये 110cc इंजिन असण्याची शक्यता आहे. यासोबतच डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी काही फीचर्स मिळतील.
मिळणार दमदार इंजिन
रिपोर्ट्सनुसार, यात 110 सीसी इंजिन असू शकते. यामुळे स्कूटरला आठ बीएचपी आणि 8.7 न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. तसेच यात एक खास फीचर मिळेल ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होईल. तसेच स्कूटरच्या वरच्या व्हेरियंटमध्ये अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक्स दिले जाऊ शकतात तर खालच्या व्हेरियंटमध्ये ड्रम ब्रेक आणि स्टील व्हील मिळेल.
देणार या कंपन्यांना टक्कर
लाँच झाल्यानंतर हीरोची ही नवीन स्कूटर TVS Jupiter, Honda Activa 110 आणि Honda Dio सारख्या स्कूटरशी स्पर्धा करेल. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमतही कंपनीकडून जवळपास 75 हजार रुपये ठेवण्याची शक्यता आहे.