Republic Day Sale 2023 : तुमच्याकडे आता नेहमीपेक्षा कमी किमतीत आयफोन,लॅपटॉप,स्मार्टवॉच तसेच स्मार्ट टीव्हीसारखे इतर उपकरणे खरेदी करण्याची संधी आहे. या उपकरणावर 65 टक्के सूट मिळत आहे. अशी भन्नाट संधी विजय सेल्सच्या मेगा रिपब्लिक डे सेलमध्ये मिळत आहे.
तसेच बँक ऑफर्स व्यतिरिक्त, या सेलमध्ये डिस्काउंट दिले जात आहे. परंतु, एक लक्षात ठेवा की ही सेल फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुम्ही दमदार फीचर्स असणारी उपकरणे खरेदी करा.अशी संधी पुन्हा मिळणार नाही.

विजय सेल्सने मेगा रिपब्लिक डे सेलची घोषणा केली असून आता यादरम्यान तुम्हाला गॅजेट्स, मनोरंजन, घरगुती तसेच स्वयंपाकघरातील उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेल.
Apple च्या उत्पादनांवर मिळेल सूट
या सेल दरम्यान Apple iPhone HDFC बँक कार्डधारकांसाठी कॅशबॅकसह 54,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असणार आहे. तसेच Apple iPhone, MacBook, iPad, Apple Watch आणि AirPods खरेदी करत असताना Apple Care+ वर 20% सवलत मिळत आहे.
स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचवर मिळत आहे जबरदस्त डिस्काउंट
तुम्ही या सेलमधून Samsung A23 हा स्मार्टफोन 18,499 खरेदी करू शकता. तसेच, Samsung Galaxy Tab A7 Lite WiFi टॅब्लेट 9,999 रुपये, फायर-बोल्ट निन्जा कॉल 2 स्मार्टवॉच 1,999 रुपये आणि Samsung Galaxy Buds 2 5,999 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीत उपलब्ध आहे.
एवढेच नाही तर तुम्ही नवीनतम 5G स्मार्टफोन, गेमिंग लॅपटॉप, फुल एचडी टीव्ही, ट्रुली वायरलेस बड्स आणि इतर अनेक उपकरणांवर चांगल्या ऑफर आहेत. तुम्ही या सेलमधून 75 टक्के सूट देऊन स्मार्टवॉच खरेदी करू शकता.
घरगुती उपकरणेही खरेदी करू शकता
तुम्ही या सेलमध्ये घरगुती उपकरणे खरेदी करू शकता. रेफ्रिजरेटरची किंमत 10,490 रुपयांपासून सुरू आहे. तसेच 26,990 रुपयांपासून सुरू होणारे एअर कंडिशनर्स, ओव्हन 4,499 रुपयांपासून उपलब्ध आहेत. त्यामुळे अशी संधी चुकवू नका.
केटल आणि कॉफी मेकर फक्त 699 रुपयांपासून खरेदी करता येत आहेत. तर ब्लेंडर, मिक्सर, ज्युसर 49% पर्यंत सूट मिळत आहे. सँडविच मेकर आणि पॉप अप टोस्टरवर 50% पर्यंत सवलत तसेच वॉटर प्युरिफायरवर 40% पर्यंत सवलत दिली जात आहे.
असा घ्या फायदा
जर तुम्हाला या सेलचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही विजय सेल्स स्टोअरला भेट द्या किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइट http://www.vijaySales.com ला भेट द्यावी लागणार आहे. तसेच आयसीआयसीआय बँक कार्डधारकांना 20,000 रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट आणि डेबिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 3000 रुपयांपर्यंतची 7.5% सवलत आणि 20,000 रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर 1500 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.
ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्डवरील EMI वर 5000 रुपयांची तर 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नॉन-ईएमआय व्यवहारांवर 5000 रुपयांची सवलत मिळू शकते.