Broadband plan : सध्या स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. तसाच इंटरनेटचा वापरही खूप वाढला आहे. त्यामुळे काहीजणांचा वेळेपूर्वी डेटा संपत आहे. अशातच सर्व कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅनही खूप महाग केले आहेत. एअरटेल आणि जिओच्या तुलनेत जास्त डेटा एक कंपनी देत आहे.
या कंपनीच्या प्लॅनची किंमतही कमी आहे. एशियानेट ब्रॉडबँडच्या प्लॅनची किंमत खूप कमी आहे. त्यामुळे जर तुम्हीही या प्लॅनचा वापर केला तर तो तुम्हाला परवडू शकतो. या प्लॅनमध्ये काय खास आहे ते पाहुयात सविस्तर..

एशियानेट ब्रॉडबँड ऑफर करते इतका डेटा
एशियानेट ब्रॉडबँड त्याच्या 1 Gbps प्लॅनसह सुमारे 8TB डेटा ऑफर करते. जर एअरटेल आणि जिओसोबत तुलना करायची झाली तर दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना खूप कमी डेटा देतात. एअरटेल 3.3TB ऑफर करते तर Jio ही 3.3TB ऑफर करते.
हा प्लॅन अधिक परवडणारा आहे.Asianet सह, तुम्हाला Rs 2,999/महिना मध्ये 1 Gbps प्लॅन मिळू शकतो. तसेच जर तुम्ही नवीन कनेक्शन घेत असाल तर तुम्हाला 500 रुपये एक्टिव्हेशन चार्ज भरावा लागणार आहे. Jio आणि Airtel दोघेही 3,999 रुपयांमध्ये 1 Gbps प्लॅन ऑफर करतात.
मिळत नाही अतिरिक्त फायदे
या प्लॅनची एक कमतरता आहे ती म्हणजे ते आपल्या वापरकर्त्यांना कोणतेही अतिरिक्त फायदे देत नाही. दुसरीकडे Jio आणि Airtel अनेक OTT प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देतात. Jio आणि Airtel या कंपन्या सेट-टॉप बॉक्स (STBs) देखील ऑफर करतात.
जिओचा एसटीबी हा डीटीएच सेवा देण्यासाठी पारंपारिक एसटीबी नाही, तर एअरटेलचा एसटीबी हा एक स्मार्ट बॉक्स आहे. ज्यामुळे रेखीय टीव्ही तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सामग्री पाहता येते. या ब्रॉडबँडने 1 Gbps प्लॅनसह वापरकर्त्यांना अतिरिक्त फायदे देणे सुरू केले तर ते अधिक चांगले होईल.