Fire Boltt Talk Ultra : LCD स्क्रीन आणि इनबिल्ट गेमसह भारतात लाँच झाले शानदार स्मार्टवॉच

Published on -

Fire Boltt Talk Ultra : मार्केटमध्ये सध्या अनेकजण शानदार फीचर्स असणाऱ्या स्मार्टवॉचला पसंती देत आहेत. त्यामुळे स्मार्टवॉच निर्मात्या कंपन्या ग्राहकांची गरज आणि मागणी लक्षात घेता स्मार्टवॉच लाँच करत .गरजेनुसार आणि फीचरनुसार ग्राहक स्मार्टवॉच घेत आहेत.

परंतु, मागणीमुळे या स्मार्टवॉचच्या किमतीही जास्त आहेत. अशातच आता Fire Boltt Talk Ultra हे स्मार्टवॉच लाँच झाले आहे. कंपनीने आपल्या नवीन स्मार्टवॉचला LCD स्क्रीन, कॉलिंग फीचर तसेच इनबिल्ट गेमसह भारतात लाँच केले आहे.

स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.39-इंचाचा एलसीडी डिस्प्ले उपलब्ध आहे. यात ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा असून यासाठी स्मार्टवॉचमध्ये मायक्रोफोन आणि स्पीकर दिला आहे. तसेच यात गुगल असिस्टंट आणि व्हॉईस असिस्टंटसाठी अॅपल सिरीचाही सपोर्ट आहे.

आपल्या वापरकर्त्यांसाठी कंपनीने यामध्ये 123 स्पोर्ट्स मोड दिले आहेत ज्यात धावणे, सायकलिंग, पोहणे इ. SpO2 मॉनिटरिंग शिवाय डायनॅमिक हार्ट रेट ट्रॅकिंग, स्लीप मॉनिटरिंग यांसारखी आरोग्य फीचर्स दिली आहेत. या स्मार्टवॉचला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग मिळाले आहे.

तसेच हे स्मार्टवॉच इनबिल्ट गेमसह येत असून त्याची बॅटरी लाईफ सात दिवसांची आहे. हे 120 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते. अॅपसह 100 पेक्षा जास्त वॉच फेस उपलब्ध असतील. या स्मार्टवॉचचे एकूण वजन 80 ग्रॅम इतके आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe