Jio : अचानक डेटा संपला तर काळजी करू नका; जिओने आणलीय शानदार ऑफर,15 रुपयांपासून सुरु आहेत प्लॅन्स

Jio : सध्या इंटरनेटशिवाय एक मिनिट वेळही काहीजणांना करमत नाही. टेलिकॉम कंपन्या वेगवेगळे प्लॅन्स सादर करत असतात. यातील काही प्लॅनच्या किमती जास्त आहेत तर काहींच्या किमती कमी आहेत. इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे रोजचा डेटा लवकर संपतो.

काहीवेळा महत्वाचे काम सुरु असताना डेटा संपतो. अशावेळी जर डेटा संपला तर काय करायचे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा जिओचे कमी किमतीचे डेटा प्लॅन फायद्याचे ठरतात. जिओचे हे प्लॅन्स 15 रुपयांपासून सुरु आहेत. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर..

हे आहेत प्लॅन्स

क्रमांक 1

जर तुम्ही जिओचे वापरकर्ते असाल आणि तुमचाही इंटरनेट डेटा लवकर संपत असेल तर तुमच्यासाठी 15 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उत्तम आहे. यात तुम्हाला 1 जीबी इंटरनेट डेटा मिळतो, ज्याची वैधता तुमच्या मुख्य प्लॅननुसार आहे.

क्रमांक 2

जर तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट संपले असेल तर तुम्ही 25 रुपयांचा रिचार्ज करू शकता. यादेखील प्लॅनची ​​वैधता तुमच्या मुख्य प्लॅनइतकीच आहे आणि यात तुम्हाला 2 GB इंटरनेट डेटा पॅक मिळतो.

क्रमांक 3

तसेच तुम्ही गरजेनुसार 61 रुपयांचा रिचार्ज करू शकता. यात तुम्हाला 6 GB इंटरनेट डेटा मिळतो. तसेच या प्लॅनची वैधता मुख्य प्लॅननुसार आहे.

क्रमांक 4

जर तुम्हाला इंटरनेटची गरज जास्त असेल तर तुमच्यासाठी 121 रुपयांचा रिचार्ज प्लॅन फायद्याचा ठरेल. या प्लॅनची ​​वैधता तुमच्या मुख्य प्लॅननुसार असून यात तुम्हाला 12 GB इंटरनेट डेटा दिला जातो.