Poco X5 Pro 5G : मस्तच! इतक्या स्वस्तात मिळणार पोकोचा नवीन धमाकेदार स्मार्टफोन, लीक झाली किंमत

Published on -

Poco X5 Pro 5G : पोकोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहि. कारण पोकोचा नवीन स्मार्टफोन Poco X5 Pro 5G लाँच होण्यास सज्ज झाला आहे. परंतु, लाँच होण्यापूर्वी त्याची किंमत लीक झालेली आहे. अहवालानुसार हा फोन 6 फेब्रुवारी रोजी लाँच होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा फोन Redmi Note 12 Speed ​​Edition चे री-ब्रँडेड व्हर्जन असणार आहे. जर फीचर्सबाबत सांगायचे झाले तर पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये रेडमीच्या या स्मार्टफोनसारखेच यात फीचर्स असणार आहेत.

एका भारतीय टिपस्टरने Poco च्या नावीन स्मार्टफोनची किंमत जाहीर केली आहे. त्याची किंमत 21,000 ते 23,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या 5G स्मार्टफोन कंपनी 6GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजसह तीन मॉडेल्समध्ये ऑफर करणार आहे. तसेच मागच्या वर्षी देशात Poco X4 Pro 5G हा फोन 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता.

अहवालानुसार, यात कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह 12GB पर्यंत रॅम आणि 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसह ऑफर करेल. या स्मार्टफोनला Android 13 आधारित MIUI 14 मिळेल. तसेच या 5G फोनमध्ये 120Hz च्या रीफ्रेश दरासह 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस OLED लवचिक डिस्प्ले असणार आहे.

जोपर्यंत कॅमेऱ्यांचा संबंध आहे, Redmi Note 12 Pro स्पीड एडिशनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ज्यात प्राथमिक लेन्स 100-मेगापिक्सेल Samsung HM2 सेन्सर तर दुसरी लेन्स 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलची आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सल्सची आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा कंपनीने उपलब्ध करून दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News