Reliance Jio : आता मोफत घेता येणार हायस्पीड इंटरनेटचा आनंद आणि प्लॅनची किंमत आहे फक्त इतकीच…

Ahmednagarlive24 office
Published:

Reliance Jio : बीएसएनएल, एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्या आपले वेगवेगळे प्लॅन्स सादर करत असतात. या सर्व कंपन्यांच्या ग्राहकांची संख्याही जास्त आहे. आपल्या ग्राहकांच्या बजेटनुसार आणि त्यांच्या मागणीनुसार कंपन्या प्लॅन्स सादर करत असतात.

अशातच आता रिलायन्स जिओने एक भन्नाट ऑफर आणली आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर मोफत हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेता येणार आहे. शिवाय प्लॅनची किंमतही खूप कमी आहे. तसेच तुम्हाला विनामूल्य चित्रपट आणि वेब सीरिजचा आनंद घेता येईल.

999 रुपयांचा प्लॅन

कंपनी आपल्या ग्राहकांसाठी या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा देत आहे. हा प्लॅन 150Mbps ची अपलोड आणि डाउनलोड गती देतो. यात मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 550 हून अधिक टीव्ही चॅनेल पाहायला मिळत आहेत. या प्लॅनमध्ये ऑफर केलेले OTT फायदे चांगले आहेत. यात तुम्हाला Amazon Prime Video सोबत Disney + Hotstar, Sony Live, G5, Voot Select आणि Eros Now सारख्या अॅप्सवर मोफत प्रवेश मिळेल.

899 रुपयांचा प्लॅन

यात ग्राहकांना 100Mbps इंटरनेट स्पीड तसेच अनलिमिटेड डेटाही मिळेल. मोफत व्हॉईस कॉलिंगचे फायदे, याशिवाय तुमच्या मागणीनुसार 550 हून अधिक टीव्ही चॅनेलचा प्रवेश मिळेल. Disney + Hotstar, Sony Liv, G5, Voot Select आणि Discovery Plus सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन कंपनीकडून मिळत आहे.

799 रुपयांचा प्लॅन

अमर्यादित डेटा आणि 100Mbps च्या इंटरनेट स्पीडसह हा प्लॅन येतो. यात तुम्हाला मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 400 हून अधिक ऑन-डिमांड टीव्ही चॅनेल पाहायला मिळतील. तसेच तुम्हाला या प्लॅनमध्ये ऑल्ट बालाजी, इरॉस नाऊ, लायन्स गेट प्ले आणि जिओ सिनेमा यांसारख्या अनेक OTT अॅप्समध्ये मोफत प्रवेश दिला जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe