Green Chickpeas Benefits : देशात सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये हरभरा पीक घेतले जाते. हिवाळा हा हरभरा पिकासाठी पोषक असतो त्यामुळे या दिवसांत हरभरा पिकवला जातो. हिरवा हरभरा घाणे शरीरास फायदेशीर असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत अनेकजण हिरवा हरभरा खात असतात. हरभऱ्यामध्ये पोषक जीवनसत्वे असतात. त्यामुळे हिरवा हरभरा खाणे आरोग्यास फायदेशीर मानले जात आहे.
हिरवे हरभरे खायलाही चविष्ट लागतात. तसेच अनेकजण हिरव्या हरभऱ्याची भाजी करतात. हिरवा हरभरा खाल्ल्याने अनेक गंभीर आजार दूर होतात असे तज्ञांनी सांगितले आहे.
हिरवा हरभऱ्याचे फायदे
केसांसाठी फायदेशीर
हिरवे हरभरे खाणे केसांसाठी फायदेशीर मानले जाते. हिरव्या हरभऱ्यापासून केसांना पोषक तत्वे मिळतात. तसेच हिरव्या हरभऱ्यापासून भरपूर प्रथिने मिळतात. केस गळणे आणि पातळ होण्याची समस्या कमी होते.
वजन कमी करते
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांना हिरवा हरभरा खाणे फायदेशीर ठरू शकते. हिरव्या हरभऱ्यामध्ये फायबर असते. फायबर हे वजन कमी करण्यास खूप उपयुक्त ठरते.
शरीराला फोलेट मिळेल
हिरवे हरभरे खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फोलेट मिळेल, व्हिटॅमिन बी9 किंवा त्यात असलेले फोलेट तुम्हाला मूड स्विंग, चिंता आणि नैराश्य यासारख्या समस्यांपासून आराम देईल. भाजीतही खाऊ शकता.
हृदय निरोगी होईल
हिरवा हरभरा खाणे हृदयाला फायदेशीर मानले जाते. कारण त्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब कमी ठेवण्यास मदत करते. रक्तदाब नियंत्रणात राहिल्यास हृदयही चांगले राहते.