India Post Recruitment : तुम्हीही सरकारी नवरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण इंडिया पोस्टमध्ये भरती निघाली आहे. या ठिकाणी अर्ज करून तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. शिवाय या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.
इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक पदासाठी पात्र आणि इच्छुक लोकांकडून अर्ज मागवत आहे. भारतभरात 2023 या वर्षासाठी इंडिया पोस्टने एकूण 40889 रिक्त पदांची घोषणा केली आहे. शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक या पदांसाठी या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
27 जानेवारी 2023 पासून, इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच www.indiapostgdsonline.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. 16 फेब्रुवारी 2023 रोजी नोंदणी प्रक्रिया बंद होणार आहे. अर्ज केलेले उमेदवार 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 अर्जात बदल करू शकतात.
भरती अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज लिंक
इंडिया पोस्ट रिक्त पद २०२३ साठी अर्ज करण्यासाठी थेट लिंक देण्यात आली आहे. उमेदवार दिलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात. तसेच रिक्त जागा, पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील पाहू शकतात.
भारत सरकार / राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांच्या कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीसह 10 वी उत्तीर्ण (एकतर अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय असणे आवश्यक आहे) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
निवड निकष
सिस्टीम जनरेट केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. गुणवत्ता यादी 10वी वर्ग माध्यमिक शाळा मान्यताप्राप्त बोर्डांच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे/श्रेणी/गुणांचे एकूण टक्केवारीत 4 दशांशांच्या अचूकतेच्या रूपांतराच्या आधारे तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त मंडळाच्या निकषानुसार सर्व विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.