Maruti Cars in India : मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार बाजारात लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी कंपनी कारच्या किमती कमी आणि मायलेज जास्त देत असल्याने ग्राहकांना घेणे परवडत आहे. मारुती सुझुकी कंपनीची एक स्वस्तात मस्त कार आहे. ही कार मायलेजही चांगले देत आहे.
मारुती सुझुकीची WagonR ही कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तसेच या गाडीचा खपही सर्वाधिक आहे. कारमध्ये ४ ते ५ लोक आरामात बसू शकतात. कार मायलेज देण्यामध्ये जबरदस्त असल्याने अनेकजण ही कार खरेदी करत आहेत.
कारची किंमत
मारुती सुझुकी वॅगनआर टूर एच3 असे कारचे नाव आहे. ही कार दोन प्रकारांमध्ये येते. H3 आणि H3 CNG असे दोन प्रकार कारचे आहेत. H3 या कारची किंमत फक्त 5.50 लाख आहे तर CNG कारची किंमत 6.40 लाख आहे.
इंजिन आणि मायलेज
मारुती सुझुकीची ही कार मायलेज देण्यात सगळ्यांच्या पुढे आहे. पेट्रोलमध्ये 24.5kmpl मायलेज देते, तर CNG मध्ये 34.73 kmpl चे मायलेज देते. त्यामुळे ग्राहक या कारकडे आकर्षित होत आहेत.
वैशिष्ट्ये
या कारची इनधन इंधन टाकीची क्षमता ३२ लिटर आहे. तसेच या कारमध्ये ४ ते ५ लोक आरामात प्रवास करू शकतात. हीटरसह मॅन्युअल एअर कंडिशनर, पुढील आणि मागील एकात्मिक हेडरेस्ट्स आणि फ्रंट पॉवर विंडो यासारख्या वैशिष्ट्यांमुळे तुमचा प्रवास आरामदायी होतो.
कारमध्ये सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. कारमध्ये ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम, सीट बेल्ट टेंशनर आणि फोर्स लिमिटर, सेंट्रल डोअर लॉकिंग आणि स्पीड लिमिटिंग फंक्शन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.