7th Pay Commission : केंद्र सरकारकडून लवकरच देशाचा नवीन वर्षातील अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले जाण्याचे शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार आहे.
कर्मचाऱ्यांचा कोरोना काळापासून DA थकला आहे. त्याबाबत कोणता निर्णय सरकारकडून घेतला जाणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. तसेच डीएमध्ये वाढ, फिटमेंट फॅक्टर याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून DA थकबाकी, डीएमध्ये वाढ, फिटमेंट फॅक्टर या तीन निर्णयांबाबत काही घोषणा करण्यात आली किंवा सकारात्मक निर्णय घेण्यात आला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होऊ शकते.
DA वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येते. नवीन वर्ष सुरु झाले आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर DA वाढीबाबत घोषणा केली जाऊ शकते. DA वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होईल.
फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर वाढवावा, अशी कर्मचाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवला तर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ होईल.
फिटमेंट फॅक्टर वाढवला तर कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार आहे.
थकबाकी DA
कोरोना काळापासून कर्मचाऱ्यांचे DA थकले आहेत. १८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना DA मिळाला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून थकीत DA द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.