Gold Price Update : लग्नसराईत सोन्याचा भाव वाढला! जाणून घ्या नवीनतम दर

Published on -

Gold Price Update : आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत आहे. सध्या लग्नसराईचे हंगाम सुरू आहेत त्यामुळे ठिकठिकाणी सोने आणि चांदी खरेदीसाठी लगबग वाढत आहे. अशातच आता सर्वसामान्य जनतेला एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे.

सोन्याचा भाव सराफ बाजारात वाढत आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्यास जात असाल तर नवीन दर तपासून घ्या. जाणून घेऊयात 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीनतम दर

आज जाहीर होतील नवीन दर

आजपासून नवीन व्यावसायिक आठवड्याला सुरुवात होत आहे. शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात सोने तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली होती.त्यामुळे आज नवीन व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

शुक्रवारी असा होता दर

शेवटच्या व्यापार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सोने तसेच चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 51 रुपयांनी महागले आणि 57189 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 184 रुपयांनी कमी होऊन ते 57138 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

त्याशिवाय शुक्रवारी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा भाव 298 रुपयांनी वाढून 68192 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर गुरुवारी, चांदीचा दर 243 रुपयांनी घसरला आणि शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 67894 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

जाणून घ्या नवीनतम सोन्याचा दर

या वाढीनंतर 24 कॅरेट सोने 51 रुपयांनी महाग होऊन 57189 रुपये, 23 कॅरेट सोने 51 रुपयांनी महाग होऊन 56960 रुपये, 22 कॅरेट सोने 47 रुपयांनी 52385 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा दर 38 रुपयांनी महाग होऊन 42892 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 30 रुपयांनी महागल्याने 33456 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार होत आहे.

स्वस्त होत आहे सोने -चांदी

सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 173 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होत आहे. यापूर्वी गेल्या वर्षी म्हणजे 24 जानेवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 57362 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदी अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा 11788 रुपये प्रति किलो दराने स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

लवकर खरेदी करा

देशात पुन्हा एकदा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला. सोने आणि चांदीच्या किमती आगामी काळातही वाढू शकतात. तसेच या वर्षी 2023 मध्ये सोन्याचे भाव वाढत राहतील. त्यामुळे जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर खरेदी करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe