PPF Scheme : अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी PPF स्कीमबद्दल मोठे अपडेट, गुंतवणुकीची मर्यादा वाढणार?

Ahilyanagarlive24 office
Published:

PPF Scheme : केंद्र सरकारकडून सर्वच क्षेत्रातील नागरिकांसाठी दिवसेंदिवस अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा शेतकरी, सरकारी कर्मचारी तसेच खाजगी कर्मचारी आणि इतर गुंतवणूकदारांना देखील फायदा होत आहे. आता PPF स्कीमबद्दल सरकारचा नियम बदलू शकतो.

लवकरच देशाचा नवीन वर्षातील अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांबद्दल अनेक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजचे पीपीएफ योजनेतही सरकारकडून मोठा बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला ग्याद होण्याची शक्यता आहे. पीपीएफ योजनेत गुंतवणूक करून अनेकजण सध्या चांगला फायदा मिळवत आहेत.

पीपीएफ योजना

पीपीएफ योजनेमध्ये १५ वर्षासाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेतील गुंतवणुकीवर व्याज देखील मिळते. यासोबतच या योजनेंतर्गत व्याज मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. अशा परिस्थितीत कर वाचवण्याच्या उद्देशाने ही योजना खूप फायदेशीर ठरू शकते.

अर्थसंकल्प 2023

२०२३ या नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये PPF योजनेटबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. या योजनेत एका वर्षात फक्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. मात्र आता या योजनेत पैसे गुंतवण्याची मर्यादा वाढू शकते.

पीपीएफ गुंतवणूक

तसेच, या अर्थसंकल्पात पीपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी लोक आणि अनेक संस्थांमधून केली जात आहे. दुसरीकडे, पीपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्यास लोकांना त्याचा भरपूर फायदा होईल आणि लोक अधिक गुंतवणूक करू शकतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe