GADAR 2 Movie Release Date : सनी देओलचा गदर 2 चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या तारीख…

Published on -

GADAR 2 Movie Release Date : अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा गदर २ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2001 मध्ये सनी देओल यांचा गदर सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.

लवकरच आता पुन्हा सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी एकत्रित दिसणार आहे. गदर २ चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

गदर २ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रजासत्ताकदिनी रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये सनी देओल जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर २ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

अनिल शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर गदार 2 चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले होते. त्या पोस्टरमध्ये “जोर से बोले…हिंदुस्तान जिंदाबाद है…. जिंदाबाद था.. और जिंदाबाद रहेगा.. हिंदुस्तान की शान, तारा सिंह वापस एक्शन में!” असे कॅप्शन देण्यात आले आहे.

सनी देओल या पोस्टरमध्ये हातात हातोडा घेऊन उभा असलेला दिसत आहे. चाहते गदर २ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सनी देओलचा दमदार लुक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

गदर २ चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. लवकरच हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यासोबतच GADAR 2 चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

गदर २ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी देशातील सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. ११ ऑगस्ट रोजी चाहत्यांना सनी देओलचा जबरदस्त लुक पाहता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe