Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजन चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच लोकही या चित्रातील आव्हान स्वीकारून कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवणे इतके सोपे नसते. त्यासाठी तुमच्याकडे निरीक्षण कौशल्ये असणे आवश्यक आहे.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी तुम्हाला शांत डोक्याने चित्राकडे एकटक पाहावे लागेल. जर तुम्ही शांतपणे चित्राकडे पहिले नाहीत तर तुम्हीही चित्रातील कोडे सोडवण्यात असमर्थ व्हाल.
ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवत असताना तुमच्या मनाचा गोधळ उडेल मात्र तुम्हाला शांत डोक्याने चित्राकडे पाहावे लागेल. चित्रात लपलेली गोष्ट सहजासहजी दिसणे कठीण आहे.
ऑप्टिकल इल्युजन चित्रात सहजासहजी गोष्ट सापडली तर ते ऑप्टिकल इल्युजनचे चित्र कसले. चित्रातील कोडे सोडवताना तुमच्या मनात भ्रम तयार होईल. मात्र गोधळून न जात बारकाईने चित्राकडे पाहणे गरजेचे आहे.
आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला एक दाढी असलेला माणूस दिसेल. मात्र तुम्हाला माणसू नाही तर त्याच्या चेहऱ्यात लपलेली मुलगी शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे.
माणसाच्या चेहऱ्यात मुलगी लपली आहे. जर तुम्ही हे आव्हान शिवकारणार असाल तर तुम्हाला चित्रात एकटक पाहावे लागेल आणि जर तुम्ही चित्रात एकटक पहिले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की मुलगी कुठे लपली आहे.
माणसाच्या चेहऱ्यात तुम्हाला डोंगर, झाडे आणि बरेच काही दिसेल. मात्र मुलगी सहज दिसणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या निरीक्षण कौशल्याचा वापर करावा लागेल. अशी चित्रे सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो असे तज्ञ् सांगतात.
ब्रॅंडन नावाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या चित्राचे नाव ‘स्पिरिट ऑफ द वुड्स’ असे आहे, जे स्विस कलाकार सँड्रो डेल प्रीटे यांनी तयार केले आहे. तुम्ही दुरून पाहिल्यास तुम्हाला या फोटोत एक व्यक्ती दिसेल. जर तुम्ही त्याकडे अधिक बारकाईने पाहाल तेव्हा तुम्हाला झाडे आणि पर्वत देखील दिसतील, परंतु मुलगी कदाचित दिसणार नाही.
जर अजूनही तुम्हाला चित्रात मुलगी दिसली नसेल तर चित्रातील व्यक्तीचे नाक पहा तुम्हाला सहज मुलगी दिसून जाईल. तरीही तुम्हाला मुलगी दिसली नसेल तर खालील चित्र पहा मुलगी स्पष्ट दिसेल.