Honda Activa EV : सिंगल चार्जमध्ये धावणार 120 KM! इलेक्ट्रिक Honda Activa मिळणार फक्त इतक्या रुपयांना…

Ahmednagarlive24 office
Published:

Honda Activa EV : होंडा ॲक्टिव्हा ही स्कूटर भारतात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर म्हणून ओळखली जाते. ग्राहकांकडून या स्कूटरला उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. लवकरच आता होंडा कंपनीकडून होंडा ॲक्टिव्हा ही स्कूटर इलेक्ट्रिकमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

कंपनीकडून सध्या होंडा ॲक्टिव्हा स्मार्ट H व्हर्जन करण्यात आले आहे. कंपनीकडून लवकरच पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च जाण्याची शक्यता आहे. होंडा ॲक्टिव्हा ही स्कूटर लवकरच पूर्णपणे इलेक्ट्रिक रूपात पाहायला मिळणार आहे.

Diy Tech.in नावाच्या यूट्यूब चॅनलने त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. होंडा ॲक्टिव्हा ही स्कूटर EV आवृत्तीमध्ये बदलली दिल्याचे दाखवण्यात आले आहे. या स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक बॅटरी बसवण्यासाठी इंजिन बदलले आहे.

मोटार मागील चाकावर बसवली आहे. ही मोटर 2 ते 2.5 किलोवॅट पॉवर जनरेट करू शकते, असा दावा व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. तर 2.88 kWh बॅटरी वापरण्यात आली आहे.

होंडा कंपनीकडून होंडा ॲक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरला सिंगल चार्जमध्ये १२० किमीपर्यंत रेंज देण्याची शक्यता आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 55 किमी/तास असू शकतो. या स्कूटरमध्ये एक स्मार्ट BMS (बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम) देखील मिळते, जी विविध माहिती प्रदर्शित करण्यासाठी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देते.

या इलेक्ट्रिक अ‍ॅक्टिव्हामधील अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंटेशन पूर्णपणे डिजिटल युनिटने बदलण्यात आले आहे. इंजिन स्टार्टरचा स्विच आता हॉर्नच्या जागी बसवण्यात आला आहे.

स्कूटरची बॅटरी कंपार्टमेंट आणि बूट स्पेस समोर आलेली नाही. चार्जिंग पॉइंट फूटबोर्डजवळ स्थित आहे. या व्यक्तीच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर स्कूटर सुमारे 1 लाख रुपयांना मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe