Budget 2023 : मोदी सरकारकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना या अर्थसंकल्पामधून मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांसाठी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दार महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढणार का कमी होणार? याबाबत अजून स्पष्ट माहिती नाही.
1 फेब्रुवारी पासून बदलांची यादी
एलपीजी किमती
एलपीजी गॅस (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या किमतींचा दर महिन्याच्या सुरुवातीला आढावा घेतला जातो. त्यामुळे किमतीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टाटा कारच्या किमती वाढल्या
अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी अनेक बदल होताना दिसत आहेत. टाटा मोटर्सकडून कारच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रवासी वाहनांच्या ICE पोर्टफोलिओच्या किमती वाढवण्याचा निर्णय टाटा मोटर्सने घेतला आहे.
1 फेब्रुवारी 2023 पासून, व्हेरिएंट आणि मॉडेलवर अवलंबून भारित सरासरी वाढ 1.2 टक्के असेल. टाटा मोटर्सने सांगितले की ते काही बोजा ग्राहकांवर टाकत आहेत. कंपनी देशांतर्गत बाजारात नेक्सॉन, हॅरियर, सफारी आणि पंचसह विविध मॉडेल्सची विक्री करते.
नोएडामध्ये जुनी वाहने जप्त करण्यात येणार आहेत
नोएडा वाहतूक पोलिसांकडून १ फेब्रुवारीपासून १५ वर्षापेक्षा जुनी वाहने १५ दिवसांच्या मोहिमेत जप्त करण्यात येणार आहेत. डिझेल इंजिनसाठी 10 वर्षे जुन्या नोंदणीवर आधारित सर्व जुनी वाहने जप्त करतील. वृत्तानुसार, UP16 Z ने सुरू होणाऱ्या नोंदणी क्रमांक असलेल्या कार 15 वर्षांपेक्षा जुन्या आहेत.
कॅनरा बँकेने डेबिट कार्ड सेवा शुल्कात वाढ केली आहे
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक 13 फेब्रुवारीपासून वार्षिक शुल्क, कार्ड बदलणे, डेबिट कार्ड निष्क्रियीकरण शुल्क आणि एसएमएस अलर्टसाठी शुल्क वाढवत आहे.
क्लासिक किंवा मानक डेबिट कार्डसाठी, वार्षिक शुल्क 125 रुपये वरून 200 रुपयापर्यंत वाढवले जाईल, प्लॅटिनम कार्डसाठी ते 250 रुपये वरून 500 रुपयापर्यंत वाढवले जाईल आणि व्यवसाय कार्डसाठी शुल्क 300 रुपये वरून 500 रुपयापर्यंत वाढवले जाईल. दरम्यान, बँकेने डेबिट कार्ड बदलण्याचे शुल्क शून्य वरून ₹150 केले आहे.
क्रेडिट कार्डवरून बिल भरण्यासाठी बँक ऑफ बडोदा अधिक शुल्क आकारेल
बँक ऑफ बडोदा 1 फेब्रुवारीपासून क्रेडिट कार्डवरील सर्व भाडे पेमेंट व्यवहारांवर एक टक्का शुल्क आकारेल. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड वापरून 10,500 रुपयेचे भाडे भरण्याचा व्यवहार केल्यास, 105 रुपये शुल्क आकारले जाईल.