Kidney Damage : सावधान ! शरीरातील ‘हे’ 5 बदल वेळीच समजून घ्या, अन्यथा किडनी होईल खराब…

Published on -

Kidney Damage : आज आम्ही या बातमीमध्ये किडनीची काळजी कशी घ्यायला हवी जेणेकरून तुमची किडनी खराब होणार नाही याबद्दल माहिती देणार आहे. अशा वेळी ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते. जाणून घ्या याबद्दल…

जास्त थकवा जाणवणे

जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ किडनी नीट काम करत नाही आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत.

स्किन प्रॉब्लम

जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा फिल्टरिंग प्रक्रियेत अडथळे येतात, त्यामुळे विषारी पदार्थ आपल्या रक्तात जमा होऊ लागतात, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. खाज सुटणे, कोरडी त्वचा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्नायूंमध्ये तीव्र वेदना

जेव्हा किडनीमध्ये कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा शरीरात टॉक्सिन आणि मिनरल्सची पातळी वाढू लागते, त्याचा परिणाम आपल्या स्नायूंवर होतो. अनेकांना स्नायूंमध्ये तीव्र वेदना जाणवतात.

झोप पुरेशी न होणे

साधारणपणे, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी दररोज 7-8 तासांची झोप पुरेशी असते, परंतु जर असे होत नसेल तर त्यामागे किडनीचा आजार असू शकतो. अनेक संशोधनांमध्ये, किडनीच्या आजाराशी स्लीप एपनियाचा संबंध आढळून आला आहे.

श्वास घेण्यास त्रास होणे

किडनीमध्ये समस्या होताच एरिथ्रोपोएटिन नावाच्या हार्मोनची कमतरता होते, जे आपल्या शरीराला लाल रक्तपेशी बनवण्याचे संकेत देते. यामुळे रक्त कमी होणे आणि श्वास घेण्याचा त्रास वाढू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News