Ration Card : रेशन कार्ड हे खासगी कामासोबत शासकीय कामात एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. रेशन कार्डमुळे फक्त स्वस्त धान्य नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जर एखादा नवीन सदस्य आपल्या घरात सामील झाला असेल, तर त्यांचेही नाव रेशन कार्डमध्ये जोडावे लागते.
परंतु, अनेकांचे रेशन कार्डमधून नकळत नाव कापले जाते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुमचेही नाव कापले असेल तर काळजी करू नका तुम्ही ते खूप सोप्या पद्धतीने जोडू शकता. कसे ते जाणून घेऊ.
फॉलो करा या स्टेप्स
स्टेप 1
जेव्हा तुम्ही रेशन घ्यायला जाता तेव्हा तुमच्या रेशनकार्डमधून कुटुंबातील कोणत्या सदस्याचे नाव काढून टाकले आहे हे तुम्हाला कळते किंवा तुम्ही ते ऑनलाइन तपासू शकता.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला http://nfsa.gov.in/Default.aspx या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
स्टेप 2
त्यानंतर तुम्हाला ‘रेशन कार्ड’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर ‘Ration Card Details On State Portals’ या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाला राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि पंचायत निवडावे लागेल.
स्टेप 3
यानंतर तुम्हाला तुमचे रेशन दुकान, डीलरचे नाव आणि रेशन कार्डचा प्रकार निवडावा लागणार आहे.
त्यानंतर तुमच्या समोर शिधापत्रिकाधारकांची यादी येईल, ज्यामध्ये तुम्हाला कळू शकेल की तुमचे नाव कापले आहे की नाही?
स्टेप 4
जर तुमचे नाव कापले असेल तर ते जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागात जावे लागेल.
तुम्हाला फॉर्म भरून कागदपत्रे एकत्र जोडावी लागतील.
हे सर्व केल्यानंतर पडताळणी होईल आणि सुमारे 2 आठवड्यांनंतर कट ऑफ नाव रेशन कार्डमध्ये जोडले जाईल.