Aadhaar-PAN deadline : कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार असेल, जमीन, घर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. तसेच पॅन कार्डशिवाय ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात किंवा बँकेत जमा करता येत नाही.
थोडक्यात सांगायचे झाले तर पॅन कार्ड हे प्रत्येक आर्थिक कामात आणि सरकारी कामात खूप गरजेचे आहे. याच्या माध्यमातून आयकर विभाग संबंधित व्यक्तीचे आर्थिक खाते सांभाळते. परंतु, आता जर तुम्ही पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक केले नाही तर तुम्ही अडचणीत याल.

जर तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन बंद करण्यात येणार आहे. लिंक करण्यासाठी तुमच्याकडे ३१ मार्चपर्यंत वेळ आहे. 1 एप्रिल 2023 पासून पॅन काम करणार नाही.
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे ई-फायलिंग पोर्टलhttps://incometaxindiaefiling.gov.in. तर दुसरा मार्ग एसएमएसद्वारे आहे.
असे करा एसएमएसद्वारे लिंक
सर्वप्रथम UIDPAN फॉरमॅटमध्ये मजकूर टाइप करा. हा मजकूर 56161 किंवा 567678 या क्रमांकावर पाठवा. तुमचा आधार क्रमांक XXXXXXXX1487 असेल आणि तुमचा पॅन ABCDE1234X हा असेल, तर मजकूर संदेश असा असेल: UIDPAN XXXXXXXX1487 ABCDE1234X. 56161 किंवा 567678
ई-फायलिंग पोर्टलद्वारे करा लिंक
- https://incometaxindiaefiling.gov.in/ वरून तुमच्या खात्यात लॉग इन करा. त्यानंतर वेबसाइटवर नोंदणी करा. पॅन हा तुमचा वापरकर्ता आयडी असणार आहे. तुमच्या पासवर्डमध्ये पंच करा.
- त्यात तुम्हाला एक पॉप अप विंडो दिसेल. ही विंडो तुम्हाला तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक करा असे सांगेल.
- समजा जर तुम्हाला विंडो सापडत नसेल, तर मेनू बारवर जाऊन नंतर प्रोफाइल सेटिंग्जवर जा. नंतर Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
- नंतर आधार आणि पॅनच्या तपशीलांची पडताळणी करा. लिंक बटण दाबा. तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक केले जाईल.