EPFO : अरे व्वा! नोकरीत असतानाही पीएफ खात्यातून काढता येणार अ‍ॅडव्हान्स

Published on -

EPFO : नोकरी करत असलेल्या लोकांच्या पगाराचा काही भाग पीएफ फंडामध्ये जमा केला जातो. या फंडामध्ये जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून व्याज दिले जाते. दरम्यान सरकारने या आर्थिक वर्षासाठी पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज निश्चित केलेलं आहे.

परंतु, तुम्हाला बँक खात्यासारखे पीएफ खात्यातून पैसे काढता येत नाही. मात्र EPFO काही अटींसह पीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देते. तुम्ही आता घरबसल्या केवळ 72 तासांत ऑनलाइन पैसे पीएफचे पैसे सहज काढू शकता.

72 तासात काढता येतात पैसे

EPFO ​​द्वारे कोविड कालावधीत, पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी आगाऊ पर्याय निवडण्याची सुविधा दिली होती. यात ७२ तासांच्या आत पैसे काढता येतात, त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

  • जर तुम्हाला अचानक पैशांची गरज पडली तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकता.
  • त्यासाठी तुम्हाला EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट http://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface ला भेट द्यावी लागणार आहे.

स्टेप 2

  • तुम्हाला UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करावे लागेल.
  • त्यानंतर ‘ऑनलाइन सेवा फॉर्म 31, 19, 10C आणि 10D’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या पीएफ खात्याशी लिंक असलेल्या बँक खात्याचा खाते क्रमांक टाकून त्याची पडताळणी करून घ्या.

स्टेप 3

  • नंतर ‘सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग’ वर क्लिक करून ‘ऑनलाइन क्लेमसाठी पुढे जा’ हा पर्याय निवडा.
  • ‘कोविड अॅडव्हान्स’ हा पर्याय निवडून तुमचा पूर्ण पत्ता भरा
  • आता पासबुक किंवा चेकबुकची स्कॅन केलेली प्रत संलग्न करून नियम आणि अटींवर क्लिक करा. तसेच तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करून सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe