UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे कोणत्या शिखरास म्हटले जाते?
उत्तर : कळसुबाई शिखर
प्रश्न : पश्चिम महाराष्ट्र विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश होतो?
उत्तर : १०
प्रश्न : गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणत्या महाराजांनी केली होती?
उत्तर : संत तुकडोजी महाराज
प्रश्न : राष्ट्रपतींना श्रमादानाचा अधिकार कोणत्या प्रकारचा अधिकार आहे?
उत्तर : कार्यकारी प्रकार
प्रश्न : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कोणाची निवड केली जाते?
उत्तर : जिल्हाधिकारी
प्रश्न : सिद्धार्थ कॉलेजची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली होती?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर