Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत पॅन कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान आता इन्कम टॅक्सकडून एक महत्वाची आणि सर्वात मोठी अधिसूचना जारी केली आहे.
त्यानुसार आता तुम्हाला लवकरात लवकर तुमचं पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करावे लागणार आहे. कारण 31 मार्चपर्यंत जर तुम्ही लिंक केलं नाहीत तर ते कायमचे बंद केले जाणार आहे. ओळखपत्र म्हणून वापरण्यात येणाऱ्या पॅन कार्डपासून आता अनेक फायदे मिळणार आहेत.
आता होणार हे फायदे :-
ओळखपत्र म्हणूनही येणार वापरता
आता सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींमध्ये पॅन कार्डचा वापर समान ओळख म्हणून करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे आता आधार नसेल तर तुम्ही पॅन कार्डचा वापर सामान्य ओळखपत्र म्हणून करता येतो.
सुरु करता येणार व्यवसाय
आता पॅनकार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरले जात असल्याने आता कोणताही व्यवसाय पॅनकार्डने सुरू केला जाऊ शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक समावेशकता वाढण्याची शक्यता आहे.
केवायसी होणार सोयीस्कर
इथून पुढे आता आधार कार्डाऐवजी पॅनकार्डने केवायसी केली जाणार आहे. जोखीम-आधारित निकषांचा अवलंब करून केवायसी प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. केवायसी निकष सरलीकृत केले जाणार असून आता युनिफाइड फाइलिंग सिस्टमला अनुमती मिळणार आहे. आतापर्यंत केवायसीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही गरजेचे होते. मात्र आता तर सरकारच्या या निर्णयानंतर केवायसी फक्त पॅन कार्डनेच करता येणार आहे.
व्यवसायाला मिळेल प्रोत्साहन
आता पॅन कार्डचा वापर सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी समान ओळखीसाठी करण्यात येणार आहे.त्यामुळे आता यातून व्यवसाय सुलभतेला चालना मिळून व्यावसायिक आस्थापनांसाठी पॅन कार्डचा वापर मूलभूत कागदपत्र म्हणून केला जाईल.