Electric Scooter : सर्वात स्वस्त आणि तुमच्या बजेटमधील इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! सिंगल चार्जवर धावणार 120kM; पहा किंमत

Published on -

Electric Scooter : इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांना पेट्रोल बाईक्स किंवा स्कूटर वापरणे परवडत नाही. अशा ओकांसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. तुमच्या बजेटमधील इलेक्ट्रिक स्कूटर आता बाजारात आली आहे.

जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ५० हजार रुपयांमध्ये दमदार फीचर्स असलेली इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला खरेदीसाठी बाजारात उपलब्ध झाली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची जाहिरात अभिनेता हृतिक रोशन करत आहे.

बाउंस इन्फिनिटी E1 स्कूटर

बाउन्स इन्फिनिटी E1 स्कूटर ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 45,099 आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये १२० किलोमीटरपर्यंत धावेल. तसेच कंपनीकडून ३ वर्षाची बॅटरी वॉरंटी देण्यात येत आहे. ही स्कूटर खरेदी केल्यानंतर तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरज पडणार नाही.

कंपनी बॅटरी आणि चार्जरसह बाउन्स इन्फिनिटी E1 स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय देखील देते. ज्याची किंमत ₹ 68,999 ठेवण्यात आली आहे, तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी करू शकता. बाउन्स इन्फिनिटी E1 स्कूटरवर कंपनी 3 वर्षे किंवा 40000 kms वॉरंटी देते

बाऊन्स इन्फिनिटी E1 स्कूटरमध्ये फ्रेंड आणि नियरमध्ये डिस्क ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच 12-इंचाचे ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत, कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या रंगांमध्ये सादर केली आहे, जी तुम्ही तुमच्या आवडत्या रंगाची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटरचा कमाल वेग ताशी 65 किलोमीटर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News