7th Pay Commission : कर्मचाऱ्यांना बसला मोठा फटका! महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट आले समोर

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission : आता एक कोटीपेक्षा जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण सध्या महागाई भत्ता वाढणार असल्याची चर्चा सुरु होती, परंतु त्यापूर्वी एक मोठे आणि महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

डिसेंबर 2022 च्या AICPI आकडेवारी समोर आली आहे. आणि त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की यावेळी महागाई भत्ता वाढणार नाही. त्यामुळे आता महागाई भत्त्यात वाढ होण्यापूर्वीच या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा झटका बसला आहे.

महागाई भत्ता वाढणार

कामगार मंत्रालयाने जाहीर केलेली डिसेंबर 2022 साठीची AICPI आकडेवारी नोव्हेंबरच्या तुलनेत घसरली असून या आकडेवारीत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सतत वाढ झाली होती. त्यामुळे डीएमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता होती.

डिसेंबरमध्ये AICPI आकडेवारीत झालेल्या घसरणीने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ऑक्‍टोबर आणि नोव्‍हेंबरमध्‍ये हे आकडे सारखेच राहिले होते. परंतु डिसेंबरमध्ये AICPI चा आकडा 132.3 अंकांवर आला आहे. त्यामुळे आता महागाई भत्त्यात 3 टक्के इतकी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

1 मार्च 2023 रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर 31 मार्चपासून कर्मचाऱ्यांना जास्त पगार आणि पेन्शनधारकांना जास्त पेन्शन मिळू शकेल. इतकंच नाही तर आता थकबाकीसह जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे पैसे खात्यात येणार आहेत.

दरम्यान, दर 6 महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा आढावा घेण्यात येतो. या आकडेवारीच्या आधारे महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवण्यात येतो. यापैकी एक भाडेवाढ जानेवारीत आणि दुसरी जुलैमध्ये होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.जानेवारी 2023 साठी महागाई भत्ता शक्यतो होळीपूर्वी जाहीर करण्यात येतो.

तर आतापर्यंतचे महागाईचे आकडे पाहता पुढील वर्षीही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होईल, अशी शक्यता आहे. जर असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खर्च सध्याच्या 38  टक्क्यांवरून 41 टक्क्यांपर्यंत वाढेल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली असल्याने देशातील सुमारे 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. सरकारने वर्षाच्या सुरुवातीला डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली असल्याने त्यामुळे महागाई भत्ता 38 टक्क्यांवर गेला होता. जर आता पुन्हा डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली तर महागाई भत्ता 41 टक्के होईल.

वर्षातून दोनदा सुधारणा करण्यात येते

वर्षातून दोनवेळा या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते. एक म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीत तर दुसरा जुलै ते डिसेंबर दरम्यान येतो. AICPI निर्देशांक केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe