Amazon Alexa : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकजण अलेक्साचा वापर करत आहेत. वापरकर्ते दररोज लाखो प्रश्न विचारत असतात. जर तुम्हीही अलेक्सा वापरत असाल तर बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. कारण नुकतेच कंपनीने अलेक्साला विचारण्यात आलेल्या प्रश्नाची लांबलचक यादी जाहीर केली आहे.
ही यादी जर तुम्ही जर वाचली तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यात वापरकर्त्यांनी सलमान खानच्या लग्नापासून ते अलेक्साचे तोंड कुठे आहे? असे अनेक भन्नाट प्रश्न विचारले आहेत. पाहुयात या प्रश्नाची यादी सविस्तर…

असे होते भन्नाट प्रश्न
- हे होते सर्वात उंच माणसापासून ते बुर्ज खलिफापर्यंत प्रश्न
दरम्यान जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत अलेक्साला लोकांनी भन्नाट प्रश्न विचारले आहेत. तसेच यासोबतच कंपनीने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची एक लांबलचक यादीही शेअर केली आहे. सामान्य ज्ञानाबद्दल बोलताना, अलेक्साला पृथ्वीवरील सर्वात उंच व्यक्तीपासून बुर्ज खलिफापर्यंतचे प्रश्न तसेच क्रिप्टोपासून ते सोने आणि बिटकॉइनच्या दरांपर्यंतचे प्रश्न विचारले आहेत.
- कुठे आहे अलेक्साचे तोंड?
तसेच भारतीय वापरकर्त्यांकडून अलेक्साला अनेक मनोरंजक आणि अनोखे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. वापरकर्त्यांनी अलेक्साला तिचे तोंड कुठे आहे? तसेच लोकांनी तिला असेही विचारले की ती त्यांचे गृहपाठ करू शकते का? याशिवाय वापरकर्त्यांकडून ट्विटरच्या संस्थापकापासून ते श्रीलंकेच्या भाषेपर्यंत प्रश्न विचारण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर वापरकर्त्यांनी अभिनेत्री कतरिना कैफच्या लाईफपासून ते सलमान खानच्या लव्ह लाईफपर्यंतचे प्रश्न विचारले आहेत. सलमान खान लग्न कधी करणार? कोण आहे सलमान खानची गर्लफ्रेंड? सलमान खान कुठे राहतो? जॉन सीना किती मजबूत आहे? पाणी ओले का आहे? शोले चित्रपटातील डायलॉग ऐका, कोण आहे रॉकी भाई? जसे अनेक भन्नाट प्रश्न अलेक्साला विचारले आहेत.
- आलिया भट्टच्या वयाची माहिती
वापरकर्त्यांनी अलेक्साला आलिया भट्टच्या वयाबद्दल विचारले तर अनुष्का शर्माच्या मुलीचे नाव विचारले. तसेच लोकांनी अलेक्साला डुग्गू आणि मिस्टर बीस्टची माहिती विचारली आहे. कुकिंग टिप्स विचारल्या आहेत. लोकांनी अलेक्साला मसाला चायपासून ते चिकन करीपर्यंतच्या पाककृती विचारल्या आहेत.