ब्रेकिंग ! मानधन वाढीसाठी राज्य शासनातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनी पुकारलं बंड ; ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर

Published on -

Maharashtra State Employee News : महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी संपाची घोषणा केली आहे. 20 फेब्रुवारी 2023 पासून हा संप पुकारला जाणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. प्रामुख्याने मानधनात वाढ व्हावी या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला असला तरी देखील अंगणवाडी सेविकांच्या काही ईतरही मागण्या आहेत. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने या संपाचे नियोजन केले आहे. वर्धा जिल्ह्यात देखील अंगणवाडी सेविका संप पुकारणार आहेत. जिल्ह्यातील कृती समितीने घेतलेल्या या निर्णयानुसार जिल्ह्यातील संपूर्ण अंगणवाडी कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 20 फेब्रुवारी रोजी भव्य मोर्चा काढून आपला रोष कर्मचारी प्रकट करणार आहेत. जिल्हा अध्यक्ष विजय पावडे यांनी या संपाबाबत माहिती दिली आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्य शासनाने साडेपाच वर्षांपूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवले होते. त्यानंतर महागाई दिवसेंदिवस वाढली परंतु पेमेंट मध्ये वाढ शासनाकडून करण्यात आली नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मते कोरोना काळात कोरोना योद्धा बनवून आपण आपले कर्तव्य पार पाडली तरी देखील शासनाने आमच्या बाबत सकारात्मक असा विचार केला नाही आणि या महागाईच्या काळात तुटपुंजा मानधनमध्ये आम्हाला आमचा संसाराचा गाडा हाकावा लागत असल्यान मानधनात शासनाने वाढ करावी या अनुषंगाने हा संप पुकारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मानधनात वाढ करण्याव्यतिरिक्त नवीन मोबाईल देणे, अंगणवाडी भाड्यामध्ये वाढ देणे, सेवा समाप्तीचा लाभ, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, आजारपणात रजा, यांसारख्या काही प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. दरम्यान हा बेमुदत संप राहणार असल्याने याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे. यावर शासन सकारात्मक निर्णय घेते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! जानेवारीपासून वाढणारा महागाई भत्ता 3% नाही तर ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, पहा डिटेल्स

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News