Business Idea : अनेकजण नोकरी सोडून किंवा नोकरी करत करत स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. जर तुम्हीही अशा व्यवसायाच्या शोधात असाल ज्यातून कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न मिळेल, तर बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. या व्यवसायाला भारतात जास्त मागणी आहे.
हा व्यवसाय करून अनेकजण महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. तसेच सरकारही व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करत आहेत. या मदतीतून तुम्ही आता सोया पनीर बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. काही महिन्यातच तुम्ही यातून बक्कळ पैसे कमावू शकता.
इतका खर्च येईल
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 लाख रुपये मोजावे लागतील. या व्यवसायाच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत बॉयलर, जार, सेपरेटर, स्मॉल फ्रीझर इत्यादी वस्तूंसाठी 2 लाख रुपये लागतील. तसेच या सोबत एक लाख रुपयांना सोयाबीन खरेदी करावे लागणार आहे. इतकेच नाही तर तुम्हाला सोया पनीर बनवण्यासाठी तज्ज्ञांचीही गरज लागणार आहे.
असे बनवा सोया पनीर
सोया पनीर बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सोया पनीर बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वात अगोदर सोयाबीन ग्राउंड केले जाऊन 1:7 च्या प्रमाणात पाण्यात उकळतात. तसेच बॉयलर आणि ग्राइंडरमध्ये 1 तास प्रक्रिया पूर्ण केले तर तुम्हाला 4-5 लिटर दूध मिळते.
या प्रक्रियेनंतर दुध सेपरेटरमध्ये टाकले जाते जेथे दूध दह्यासारखे होते.त्यानंतर, उरलेले पाणी त्यातून काढून टाकण्यात येते. सुमारे 1 तास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला 2.5 ते 3 किलो सोया पनीर मिळेल. तुम्ही रोज 30-35 किलो सोया पनीर बनवू शकत असाल, तर तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये मिळवू शकता.
बाजारात आहे मोठी मागणी
सध्या बाजारात सोया दूध आणि सोया पनीरला खूप मागणी असून सोयाबीनपासून सोया दूध आणि पनीर तयार केले जातात. सोया दुधाची पौष्टिकता आणि चव गाई-म्हशीच्या दुधासारखी नसली तरी ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते. रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. सोयाबीन चीजला सोया पनीर असेही म्हणतात.
प्रत्येक उत्पादन खूप उपयुक्त आहे
सोया पनीर बनवत असताना आपल्याकडे उपउत्पादन म्हणून केक शिल्लक असतो. याच्या मदतीने आणखी अनेक उत्पादने तयार केली जातात. या केकचा उपयोग बिस्किटे बनवण्यासाठीही केला जातो. यानंतर जी उत्पादने तयार केली जातात त्याची बारी तयार केली जाते. ही बारी अन्नात वापरण्यात येते. हे प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत मानले जाते.