Jitendra awhad : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत. याबाबत आता भाजप आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत.
आव्हाड यांच्या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

दरम्यान, औरंगजेब आणि शायिस्तेखान होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यामुळे आता भाजपा आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
जळगावमध्ये आमदार सुरेश चव्हाण हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे, असेही ते म्हणाले.
तसेच केवळ मत मागण्यासाठी राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरात असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. आता राष्ट्रवादी यावर काय प्रतिक्रिया देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.